New Business Idea In Marathi : जर तुम्हीही रोजच्या आठ तासांच्या नोकरीला कंटाळला असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास राहणार आहे. खरंतर, अलीकडे नोकरी ऐवजी व्यवसाय करण्यास अधिक पसंती दाखवली जात आहे. नोकरीमधला अनेकांचा रस कमी झाला आहे. पूर्वी नोकरी करण्यास अधिक पसंती दाखवली जात होते.
मात्र कोरोना काळापासून नोकरी मधील अनिश्चितता आता सर्वसामान्यांना अस्वस्थ करू लागली आहे. जगातील अनेक नामांकित कंपन्यांनी नोकर कपातीला सुरुवात केली असल्याने आता नोकरीऐवजी आपला व्यवसाय बरा असे मत अनेकांकडून व्यक्त केले जात आहे. जर तुम्हीही यापैकीच एक असाल आणि नोकरी ऐवजी व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन हजर झालो आहोत.
आज आपण एका महत्त्वाच्या बिजनेस आयडिया बद्दल जाणून घेणार आहोत. जसं की आपणास ठाऊकच आहे की या 21व्या शतकाला मोबाईलचे युग म्हणूनही ओळखले जाते. याचे प्रमुख कारण म्हणजे या शतकात मोबाईलचा मोठा वापर वाढला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आलेली क्रांती मोबाईलचा वापर वाढवत आहे.
आता देशातील प्रत्येक नागरिकाकडे स्वतःचा मोबाईल आहे. विशेष म्हणजे सर्वांकडेच स्मार्टफोन आहे. अशा स्थितीत जर तुम्ही मोबाईलचे टेंपर्ड ग्लास बनवण्याचा व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला चांगली कमाई होऊ शकते. जें लोक नवीन स्मार्टफोन विकत घेतात ते सर्वप्रथम आपल्या मोबाईलला टेंपर्ड ग्लास बसवतात.
तसेच हे ग्लास तुटले किंवा याला स्क्रॅच आले की लगेचच हा ग्लास बदलला जातो. यामुळे या बिझनेसची कायमच डिमांड राहणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण या टेम्पर्ड ग्लास मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस संदर्भात सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसा सुरु करणार व्यवसाय
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कच्चा माल लागणार आहे. तसेच तुम्हाला काही मशीन्स देखील लागतील. हा व्यवसाय तुम्ही तुमचे घर जर मोठे असेल तर घरातूनही सुरू करू शकता. किंवा मग भाड्याने जागा घेऊन हा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता.
या व्यवसायासाठी तुम्हाला Anti Sock Screen Protector Film या कच्च्या मालाची गरज भासणार आहे. याशिवाय एक Automatic Tempered Glass Making Machine देखील तुम्हाला लागणार आहे. याशिवाय तुम्हाला हा ग्लास पॅक करण्यासाठी काही पॅकिंग मटेरियल देखील लागणार आहेत.
कसा बनतो टेम्पर्ड ग्लास?
हा टेम्पर्ड ग्लास Anti Sock Screen Protector Film पासून बनवला जातो. हा ग्लास Automatic Tempered Glass Making Machine च्या साहाय्याने बनवला जातो. या मशीनमध्ये एक सॉफ्टवेअर इन बिल्ट असते. हे सॉफ्टवेअर एप्लीकेशनच्या माध्यमातून कंट्रोल होते. हा ग्लास बनवण्यासाठी सर्वप्रथम टेम्पर्ड ग्लास शीट या मशीन मध्ये फिट बसवावे लागते. यानंतर मशीन सुरू करावे लागते.
मग हे मशीन लॅपटॉप किंवा मोबाईल सोबत कनेक्ट करावे लागेल. मोबाईल मध्ये किंवा लॅपटॉप मध्ये याचे एप्लीकेशन तुम्हाला डाऊनलोड करावे लागेल. यानंतर मग एप्लीकेशन मध्ये तुम्हाला ज्या टाईपचे ग्लास बनवायचे आहेत ते डिझाईन सिलेक्ट करायचे आहे. अशाप्रकारे या ऑटोमॅटिक मशीनच्या माध्यमातून ग्लास तयार केला जातो. टेम्पर्ड ग्लास तयार केल्यानंतर याला पॅक करायचे आहे. पॅकिंग नंतर हा ग्लास बाजारात विक्रीसाठी पाठवायचा आहे.
किती खर्च येणार?
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला या व्यवसायाचे रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. सोबतच व्यवसायाचे लायसन्स देखील तुम्हाला काढावे लागणार आहे. जेणेकरून भविष्यात तुम्हाला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला मशीन्स खरेदी करावे लागतील त्यासाठी जवळपास एक लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक तुम्हाला करावी लागेल.
तसेच इतर वस्तूसाठी तुम्हाला 50 हजारापर्यंत खर्च करावा लागेल. एकंदरीत दीड लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीत तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. मात्र जर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जागा घेऊन हा व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर तुम्हाला अधिक गुंतवणूक करावी लागणार आहे.
किती कमाई होणार?
एका रिपोर्टनुसार टेम्पर्ड ग्लास बनवण्यासाठी जवळपास दहा ते पंधरा रुपयांचा खर्च येतो. हा ग्लास बाजारात 100 पर्यंत विकला जातो. म्हणजेच एका ग्लासमागे 85 ते 90 रुपयांपर्यंतची कमाई होऊ शकते. अशा तऱ्हेने तुम्ही जेवढा अधिक सेल करायला तेवढा तुम्हाला या व्यवसायातून नफा मिळवता येणार आहे.
जर तुम्ही एका महिन्यात 1000 ग्लास सेल केले तर तुम्हाला महिन्याकाठी 85,000 पर्यंतचे उत्पन्न मिळेल. यात खर्च वजा जाता तुम्हाला 60 हजारापर्यंतची कमाई होऊ शकते. मात्र कमाईचा हा आकडा सर्वस्वी विक्रीवर अवलंबून राहणार आहे.