मोठी बातमी ! ‘या’ शहरात विकसित होतंय नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ, पीएम मोदी लवकरच करणार उद्घाटन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New Airport Inauguration : सध्या देशात रस्ते, रेल्वे आणि विमान वाहतूक सक्षम करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून देशात विविध रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. शहरा-शहरांना थेट रस्ते मार्गाने जोडले जात आहे.

मोठमोठ्या महामार्गाची कामे हाती घेण्यात आली आहेत. याशिवाय रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यासाठी नवीन रेल्वे मार्ग तयार करणे प्रस्तावित करण्यात आले आहे. शिवाय वंदे भारत एक्सप्रेस सारख्या हायस्पीड ट्रेन देखील चालवल्या जात आहेत.

मुंबई, पुणे, नागपूर, हैद्राबाद यांसारख्या शहरात मेट्रो देखील सुरू झाल्या आहेत. याशिवाय बुलेट ट्रेनचे काम देखील वेगाने सुरू आहे. एवढेच नाही तर आता विमान वाहतूक देखील सुरळीत केली जात आहे. यासाठी देशातील विविध शहरांमध्ये नवीन विमानतळ विकसित होत आहेत.

प्रभू श्रीरामांच्या नगरीतही नवीन विमानतळ विकसित केले जात आहे. दरम्यान प्रभू श्रीरामांची नगरी अर्थातच अयोध्येत तयार होत असलेल्या नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथे विकसित होत असलेल्या विमानतळाचे उद्घाटन केले जाणार आहे. विशेष म्हणजे नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच हे विमानतळ प्रवाशांसाठी सुरू केले जाणार आहे.

25 डिसेंबर 2023 ला पंतप्रधान मोदी हे या विमानतळाचे उद्घाटन करणार आहेत. वास्तविक हे विमानतळ अयोध्या येथे विकसित होत असलेले भव्य दिव्य राम मंदिर सुरू होण्यापूर्वीच प्रवाशांसाठी खुले केले जाईल अशी घोषणा करण्यात आली होती.

नुकत्याच काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि विके सिंग यांनी अयोध्या येथे तयार होत असलेल्या विमानतळाची पाहणी केली होती.

त्यावेळी संबंधितांना या प्रकल्पाची सर्व कामे 15 डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. यामुळे हा विमानतळ प्रकल्प नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच प्रवाशांसाठी सुरू होणार हे जवळपास नक्की झाले होते.

UP राज्य सरकारने भारतीय विमानतळ प्राधिकरणाला (AAI) 821 एकर जमीन उपलब्ध करून दिली आहे. एएआय आंतरराष्ट्रीय विमानतळाचे बांधकाम युद्धपातळीवर करत आहे.

येत्या काही दिवसात या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संपूर्ण बांधकाम पूर्ण होईल आणि नंतर हे विमानतळ प्रवाशांसाठी खुले होणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा