नवी मुंबईकरांसाठी गुड न्यूज ! ‘हा’ मार्ग लवकरच होणार सुरू, वाहतूक कोंडीतून मिळणार दिलासा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Navi Mumbai News : नवी मुंबईकरांसाठी एक मोठी आणि अतिशय कामाची बातमी समोर येत आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, नवी मुंबईमध्ये दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत आहे. शहरात वाढणारी लोकसंख्या आणि वाहनांची संख्या पाहता सध्याचे रस्ते अपुरे पडत आहेत.

वाहतूक व्यवस्थेवर याचा मोठा ताण पडत आहे. यामध्ये वासी खाडी पुलावर देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. म्हणून ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडून सामूहिक प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून नवी मुंबई येथील वाशी खाडीपुलावर तिसरा उड्डाणपूल उभारला जात आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

खरतर सायन-पनवेल मार्गावरील वासी खाडीपुलावर सन 1971 मध्ये पहिला उड्डाणपूल बांधण्यात आला होता. यानंतरही या खाडी पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागली. यामुळे 1995 मध्ये पुन्हा एकदा दुसरा उड्डाणपूलं विकसित करण्यात आला.

मात्र खाडीपुलावर दोन उड्डाणपूलाच्या 6 मार्गीका असतानाही आणि रस्ता आठपदरी असतानाही वाहतूक कोंडी पूर्णपणे संपलेली नाहीये. गेल्या काही वर्षांपासून पुन्हा या पुलावर मोठ्या प्रमाणात ट्राफिक जामची समस्या पाहायला मिळत आहे.

यामुळे आता या खाडीवर तिसरा उड्डाणपूल तयार केला जात आहे. आता दोन मार्गीका असलेला पूल बनवला जात आहे. सध्या या पुलाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

दरम्यान या पुलाच्या कामासंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी मोठी माहिती दिली आहे. भुसे यांनी या पुलाची पहिली मार्गीका मे 2024 मध्ये आणि दुसरी मार्गिका सप्टेंबर 2024 मध्ये सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुली होणार असा विश्वास व्यक्त केला आहे.

दरम्यान या पुलाच्या दोन मार्गिका सुरू झाल्यानंतर हा संपूर्ण रस्ता बारा पदरी बनणार आहे. यामुळे या पुलावरील वाहतूक कोंडीची समस्या समूळ नष्ट होईल आणि येथील वाहतूक सुरळीत होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.