नवी मुंबईकरांना दिवाळीपूर्वी मिळणार मोठी भेट! ‘हा’ महत्त्वाचा मेट्रो मार्ग होणार सुरू, पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा, कसे असतील तिकीट दर?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Navi Mumbai News : मुंबई आणि उपनगरातील नागरिकांसाठी शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. खरंतर मुंबई शहर जगातील सर्वाधिक घनता असलेल्या शहरांच्या यादीत आहे.

म्हणजेच या शहरात कमी जागेत अधिक लोक वास्तव्यास आहेत. यामुळे सध्याची वाहतूक व्यवस्था वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर कमी पडत आहे. हेच कारण आहे की, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी शहरात विविध मार्गांवर मेट्रो सुरू केल्या जात आहेत.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अशातच आता नवी मुंबई शहरातील रहिवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे नवी मुंबई मधील नागरिकांना लवकरच मेट्रोची भेट मिळणार आहे. यामुळे नवी मुंबईतील नागरिकांचे मेट्रोचे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. बेलापूर ते पेंढार या मार्गावर लवकरच मेट्रो धावणार आहे.

सिडकोकडून नवी मुंबईमध्ये चार मेट्रोमार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. यामध्ये 11 किलोमीटर लांबीच्या बेलापूर ते पेंढार या मार्गाचा देखील समावेश केला जातो. दरम्यान या मार्गाचे काम आता पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे 21 जून 2023 रोजी रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी या मार्गावर प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी सिडकोला परवानगी देखील दिली आहे.

यामुळे आता लवकरच हा मेट्रो मार्ग सुरू होणार आहे. हा मार्ग केव्हा सुरू होणार याबाबत अद्याप कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, या मार्गाचे 15 ऑक्टोबर रोजी अर्थातच घटस्थापनेच्या दिवशी उद्घाटन होऊ शकते असा दावा एका मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे.

यामुळे आता घटस्थापनेच्या दिवशी हा मार्ग सुरू होतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. दरम्यान, आता आपण या मार्गावर मेट्रो प्रवासी वाहतूक सुरू झाल्यानंतर प्रवाशांकडून किती तिकीट दर आकारला जाऊ शकतो याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेऊया.

कसे असतील तिकीट दर ?

एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आलेल्या माहितीनुसार, या मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू झाल्यानंतर प्रवाशांना 2 किलोमीटरसाठी 10 रुपये, 2 ते 4 किलोमीटरसाठी 15 रुपयाचे तिकीट काढावे लागणार आहे.

त्यानंतर प्रति 2 किलोमीटरचे भाडे 5 रुपय आकारले जाऊ शकते. तसेच 10 किमीच्या पुढे भाडे 40 रुपये राहू शकते आणि बेलापूर ते पेंढार दरम्यानचे संपूर्ण भाडे 40 रुपये एवढे राहील अशी माहिती समोर आली आहे.

मार्गावरील स्थानक कोणते ?

नवी मुंबई मधील या मेट्रो मार्गावर बेलापूर, सेक्टर – 7 बेलापूर, सायन्स पार्क, उत्सव चौक, सेक्टर 11 खारघर, सेक्टर 14 खारघर, सेंट्रल पार्क, पेठापाडा, सेक्टर 34 खारघर, पंचानंद आणि पेंढार टर्मिनल ही अकरा स्थानके तयार करण्यात आली आहेत.