नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! ठाणे ते बेलापूर प्रवास होणार सुपरफास्ट, महापालिकेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Navi Mumbai News : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील बहुतांशी रस्ते चकाचक झाले आहेत. मुंबईमध्ये देखील अनेक रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आली आहे. राज्यात मोठमोठ्या महामार्गांची कामे सुरू आहेत. मुंबई, नवी मुंबईसह संपूर्ण उपनगरांमध्ये विविध रस्ते विकासाच्या मोठ-मोठ्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत.

मात्र असे असले तरी या मोठमोठ्या प्रकल्पांच्या कामांमध्ये काही छोटी कामे मात्र राहून जात आहेत. यामुळे मुंबईसह मुंबई उपनगरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ठाणे ते बेलापूर हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावर रोजाना हजारो नागरिक प्रवास करतात. मात्र या मार्गावर असलेल्या बहुतांशी उड्डाणपूलांची दुर्देशा झालेली आहे.

पुलांचा पृष्ठभाग खडबडीत झाला असून खड्डे पडले आहेत. रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता हा मोठा प्रश्न आहे. यामुळे या चाळण झालेल्या रस्त्याने प्रवास करताना नागरिकांना अपघातांचा देखील सामना करावा लागत आहे. खड्ड्यामुळे वाहनचालकांचा तोल जातो आणि मोठ्या प्रमाणात येथे अपघात होत आहेत.

यामुळे या पुलांची दुरुस्तीची कामे लवकरात लवकर झाली पाहिजे अशी मागणी स्थानिकांच्या माध्यमातून केली जात होती. दरम्यान नागरिकांची ही मागणी नवी मुंबई महापालिकेने गांभीर्याने घेतली असून ठाणे ते बेलापूर या मार्गावर असलेल्या पाच उड्डाणपूलांची दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत.

त्यासाठी 6 कोटी 34 लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे. नवी मुंबई महापालिकेने याबाबतचा निर्णय घेतला असून या पुलांची दुरुस्ती झाल्यानंतर या मार्गाने सुसाट वेगाने वाहने जाऊ शकणार आहेत.

यामुळे नागरिकांचा प्रवास आधीच्या तुलनेत जलद होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. ठाणे ते बेलापूर या मार्गावरील तळवली उड्डाणपूल, कोपरखैरणे उड्डाणपूल, सविता उड्डाणपूल, ऐरोली उड्डाणपूल आणि घनसोली उड्डाणपूल या पुलांची कामे नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून केली जाणार आहेत. सध्या यासाठी निविदा प्रक्रिया राबवली जात आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाली की संबंधित कंत्राटदाराला लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले जाणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा