मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी ; ‘या’ मेट्रो मार्गाचे उद्घाटन पुन्हा पडले लांबणीवर, वाचा डिटेल्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Navi Mumbai Metro News : मुंबई शहरात आणि उपनगरात गेल्या काही वर्षांपासून विशेषतः जेव्हापासून शहरात मेट्रो मार्ग सुरू झाले आहेत तेव्हापासून मुंबई शहरातील नागरिकांचा प्रवास गतिमान आणि सुरक्षित झाला आहे. मात्र असे असले तरी शहरातील आणि उपनगरातील वाहतूक कोंडी पूर्णपणे संपलेली नाहीये.

अजूनही मुंबई शहरात आणि उपनगरात वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. पण ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडून सामूहिक प्रयत्न केले जात आहेत एवढे नक्की. दरम्यान, नवी मुंबई मधील नागरिकांचा प्रवास गतिमान व्हावा यासाठी नवी मुंबई शहरात देखील मेट्रो सुरु केली जाणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

खरंतर नवी मुंबई मेट्रोची पायाभरणी 2011 मध्ये झाली आहे. मात्र तब्बल बारा वर्षांचा काळ उलटूनही नवी मुंबईकरांना मेट्रोची भेट मिळालेली नाहीये. यामुळे नागरिकांमध्ये शासन आणि प्रशासनाविरोधात नाराजी पाहायला मिळत आहे. हेच कारण आहे की, नवी मुंबई मधील मेट्रोमार्ग 30 ऑक्टोबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्याचे नियोजन आखण्यात आले होते.

नवी मुंबई मधील बेलापूर ते पेंढार या मेट्रो मार्गाला 30 ऑक्टोबरला हिरवा झेंडा दाखवण्याचे नियोजन होते. या मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार होते. मात्र, आता हा मार्ग 30 ऑक्टोबरला उद्घाटित होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या मार्गाचे उद्घाटन आता अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे.

खरंतर हा मार्ग सुरू करण्यासाठी या आधीच मेट्रो सुरक्षा आयुक्ताकडून परवानगी देण्यात आली आहे. पण आता या मार्गाचे उद्घाटन पुन्हा एकदा लांबले असल्याने नवी मुंबईकरांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळत आहे.

या मेट्रो मार्गात सीबीडी-बेलापूर, सेक्टर 7, सिडको सायन्स पार्क, उत्सव चौक, खारघर सेक्टर 11, खारघर, सेक्टर 14, खारघर सेंट्रल पार्क, पेठपाडा, खारघर सेक्टर 34, पाचनंद आणि पेंधर-तळोजा ही महत्वाची स्थानके राहणार आहेत. या मार्गामुळे खारघर नोडसह कळंबोली, रोडपाली आणि तळोजा परिसरातील प्रवाशांना मोठा फायदा मिळणार आहे.