नासिक-पुणे हायस्पीड ट्रेन प्रकल्पाबाबत महत्वाची बातमी ! बहुचर्चित प्रकल्पाला मिळणार गती, ‘या’ तारखेला मुख्यमंत्री घेणार बैठक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nashik-Pune Highspeed Train : राज्याची राजधानी मुंबई, सांस्कृतिक राजधानी पुणे आणि नासिक या तीन शहरांचा सुवर्ण त्रिकोण राज्याच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. हे तिन्ही शहर विकसित शहरांच्या यादीत आहेत. अलीकडे नाशिक शहराचा देखील झपाट्याने विकास झाला आहे. मुंबई आणि पुणे या शहराचा तर फार पूर्वीपासूनच विकास सुरू आहे.

अशातच या सुवर्ण त्रिकोणातील नासिक ते पुणे या दरम्यानचा प्रवास गतिमान करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून नासिक-पुणे सेमी हायस्पीड ट्रेन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. हा प्रकल्प नासिक, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यासाठी महत्त्वाचा राहणार आहे. नासिक आणि पुणे अहमदनगर मार्गे या प्रकल्पाच्या माध्यमातून जोडले जाणार आहे. हा प्रकल्प एकूण 232 किलोमीटर लांबीचा असून या प्रकल्पासाठी अहमदनगर, नासिक आणि पुणे जिल्ह्यात जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व नासिक या दोन तालुक्यातील एकूण 22 गावात जमिनीचे भूसंपादन होणार असून जवळपास 282 हेक्टर जमीन संपादित केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. खरंतर गेल्या महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात या प्रकल्पाला गती मिळाली होती. MVA सरकारमध्ये वर्तमान उपमुख्यमंत्री अजित पवार वित्त मंत्री म्हणून कार्यरत होते. त्यावेळी पवार यांनी या प्रकल्पाला गती देण्याचे काम केले होते.

पवार या प्रकल्पाचा वित्तमंत्री असताना दर पंधरा दिवसाला आढावा घेत होते. मात्र महाविकास आघाडी सरकार कोसळले. राज्यात सत्ता बदल झाला आणि नवोदित शिंदे-फडणवीस सरकार राज्यात आले. शिंदे-फडणवीस सरकारच्या कार्यकाळात मात्र या प्रकल्पाला अपेक्षित अशी गती मिळाली नाही. पण गेल्या सरकारच्या काळात वित्तमंत्री पदी विराजमान असलेले अजित पवार या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये नुकतेच सामील झाले आहेत.

या वर्तमान सरकारमध्ये अजितदादा यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत झाल्यानंतर अजित पवार यांनी या प्रकल्पाला पुन्हा एकदा गती देण्याचा निर्णय घेतला असून यासाठी त्यांनी प्रयत्न देखील सुरू केले आहेत. अशातच या प्रकल्पासंदर्भात एक महत्त्वाची माहिती हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार या प्रकल्पासाठी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेणार आहेत.

विशेष म्हणजे उद्या अर्थातच 9 ऑगस्ट रोजी या प्रकल्पासंदर्भात एक महत्त्वाची बैठक सह्याद्री येथील अतिथीगृहात पार पडणार आहे. ही बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. यामुळे आता उद्या होणाऱ्या बैठकीत या प्रकल्पाबाबत काय निर्णय होतो याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहणार आहे.

नासिक जिल्ह्यातील प्रकल्प बाबतची सद्यस्थिती

या प्रकल्पासाठी नाशिक जिल्ह्यातील नाशिक आणि सिन्नर या दोन्ही तालुक्यात सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. विशेष बाब अशी की, सिन्नर तालुक्यातील 17 गावांसाठी जमिनीचे दर देखील यापूर्वीच घोषित करण्यात आले आहेत. पण नासिक तालुक्यातील जमिनीच्या संदर्भात अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही. हा प्रकल्प महा रेलच्या माध्यमातून पूर्ण केला जात असून महारेलने निधीचे कारण पुढे करत या प्रकल्पासाठीचे भूसंपादन थांबवण्याची विनंती केली होती. मात्र महारेलच्या या विनंती वर मोठी टीका झाली. यानंतर मग महारेलने स्पष्टीकरण देत भूसंपादन पुन्हा सुरू करण्यासाठी सांगितले होते.

नासिक-पुणे सेमी हायस्पीड ट्रेन प्रकल्पाचे वैशिष्ट्ये

हा प्रकल्प 232 किलोमीटर लांबीचा आहे. पुणे, अहमदनगर आणि नासिक या जिल्ह्यातून हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत हाय स्पीड ट्रेनचा वेग ताशी 200 किलोमीटर राहणार आहे. यामुळे पुणे ते नाशिक हा प्रवास फक्त पावणे दोन तासात पूर्ण करता येणार आहे. या प्रकल्पा अंतर्गत 18 बोगदे, 41 उड्डाणपूल आणि 128 भुयारी मार्ग प्रस्तावित आहेत. एकंदरीत हा प्रकल्प पूर्ण झाला तर नासिक ते पुणे हा प्रवास गतिमान होण्यास मदत मिळणार आहे. यामुळे हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण झाला पाहिजे अशी मागणी आहे.