नांदेडच्या अवलियाचा चमत्कार ! शिक्षकी पेशा सांभाळत सुरू केले शेळीपालन, कमवलेत लाखों रुपये, कसं केलं नियोजन? वाचा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nanded Farmer Success Story : अलीकडे सुशिक्षितवर्ग शेतीकडे आकृष्ट होत आहे. सुशिक्षित वर्गाने आता शेती सोबतच शेतीपूरक व्यवसायांमध्ये देखील आपला हात आजमावायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे शेतीसोबतच शेती पूरक व्यवसायांमधून देखील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. शेतीपूरक व्यवसायांमध्ये अलीकडे शेळीपालन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जाऊ लागला आहे. शेळीपालन व्यवसाय कमी भांडवलात सुरू होत असल्याने या व्यवसायातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे.

नांदेड येथील एका प्राध्यापकाने देखील शेळीपालन हा शेतीपूरक व्यवसाय यशस्वी करून दाखवला आहे. त्यांनी आपला शिक्षकी पेशा सांभाळत शेळीपालन हा व्यवसाय सुरू केला असून यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. यामुळे या अवलियाने कायमस्वरूपी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील लाजवले आहे. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्याच्या कलंबर खुर्द येथील रामकिशन घोरबाडे असे या प्राध्यापकांचे नाव आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

घोरबाडे यांनी कमी खर्चात शेळी पालन व्यवसाय करता येत असल्याने आणि शेळीपालन व्यवसायातून मांस आणि दूध असे दुहेरी उत्पादन मिळत असल्याने शेळीपालन करण्याचा निर्णय घेतला. घोरबाडे कंधार येथील शिवाजी माध्यमिक विद्यालयात जुनियर प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहेत. दरम्यान त्यांनी हा शिक्षकी पेशा सांभाळत शेतीमध्ये देखील चांगली कामगिरी करून दाखवली आहे.

सध्या ते गावाकडे असलेल्या पाच एकर जमीनीवर शेती करत आहेत आणि शेतीला जोड व्यवसाय म्हणून त्यांनी शेळीपालन हा व्यवसाय सुरू केला आहे. शेळीपालन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम बंदिस्त शेळीपालनबाबत सर्व माहिती जाणून घेतले. यासाठी त्यांनी youtube चा वापर केला. युट्युब मधून प्राप्त झालेल्या माहितीनुसार तसेच मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी 2019 मध्ये शेळीपालन सुरू केले. त्यांनी पंजाब मधून 15 आफ्रिकन जातीच्या शेळ्या आणि एक बोकड खरेदी करून हा व्यवसाय सुरू केला.

सुरुवातीला यासाठी त्यांना साडेतीन लाख रुपयांचा खर्च आला. शेळीपालनासाठी त्यांनी त्यांच्या शेतात शेड उभारले आणि राधाई गोट फार्म सुरू केला. हा व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यांना या व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळाले. यामुळे त्यांनी शेळीपालन व्यवसायाची व्याप्ती वाढवली आणि आजच्या घडीला त्यांच्याकडे 60 आफ्रिकन बोअर जातीच्या शेळ्या आहेत. यातून त्यांना आता दरवर्षी चार लाखांचे उत्पन्न मिळत आहे. विशेष म्हणजे या परिसरात आफ्रिकन बोअर जातीच्या शेळीपालनाचा हा पहिलाच प्रयोग असल्याचे त्यांनी सांगितले आहे.