नमो शेतकरीचा पहिला हप्ता दिवाळीपूर्वी मिळणार का ? कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्टच सांगितले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Namo Shetkari Yojana : अर्थसंकल्प 2023-24 मध्ये वर्तमान उपमुख्यमंत्री तथा तत्कालीन वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महा सन्माननिधी योजनेची घोषणा केली. ही योजना पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे.

अर्थातच पीएम किसान योजनेअंतर्गत ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जात आहेत त्याच धर्तीवर नमो शेतकरी योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिरिक्त सहा हजार रुपये मिळणार आहे. म्हणजेच पीएम किसान योजनेचे 6000 आणि नमो शेतकरीचे 6000 असे एकूण 12,000 राज्यातील शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत. दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे एकूण तीन हफ्त्यात ही रक्कम पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे.

विशेष म्हणजे पीएम किसानसाठी जे शेतकरी पात्र राहतील तेच नमो शेतकरीसाठी पात्र राहणार आहे. मात्र आता या योजनेची घोषणा होऊन सहा महिन्यांचा काळ उलटला आहे तरी देखील या योजनेचा पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांना मिळालेला नाही. अशातच मात्र या योजनेबाबत एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे.

काल राज्य शासनाने या योजनेच्या पहिल्या हफ्त्याला मंजुरी दिली आहे. पहिल्या हफ्त्याच्या वितरणासाठी राज्य शासनाने 1720 कोटी रुपयांना मान्यता दिली आहे. यामुळे आता हा हफ्ता दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांना मिळणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील एक महत्त्वाची माहिती दिली आहे.

केव्हा मिळणार नमो शेतकरीचा पहिला हफ्ता ?

खरतर, नमो शेतकरीचा पहिला हप्ता पीएम किसान योजनेच्या चौदाव्या हफ्त्यासोबत दिला जाईल असा दावा केला जात होता. मात्र पीएम किसानचा चौदावा हफ्ता 27 जुलैलाच शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला. विशेष म्हणजे पीएम किसानचा पंधरावा हफ्ता देखील दिवाळीपूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. यामुळे नमो शेतकरीचा पहिला हप्ता देखील दिवाळीपूर्वीच जमा झाला पाहिजे अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे. दरम्यान, कृषिमंत्री मुंडे यांनी याबाबत बोलतांना सांगितले की, या योजनेंतर्गत दिला जाणारा हा पहिला हफ्ता एप्रिल ते जुलै २०२३ या कालावधीचा राहणार आहे.

हा पहिला हप्ता दिवाळी आधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. नमो शेतकरीचे 2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी जमा व्हावेत असा प्रयत्न असल्याचे कृषीमंत्र्यांनी यावेळी सांगितले आहे. यामुळे आता नमो शेतकरीचे 2000 आणि पीएम किसानचे 2000 असे एकूण चार हजार रुपये दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळू शकतात असे चित्र तयार होत आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा