Namo Shetkari Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या नमो शेतकरी योजनेबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. नमो शेतकरी योजना ही अलीकडे सुरू करण्यात आलेली महाराष्ट्र राज्य शासनाची एक महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात वर्तमान शिंदे-फडणवीस-पवार सरकारने केली आहे.
या योजनेअंतर्गत राज्यातील पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जात आहेत. म्हणजे पी एम किसान चे 6000 आणि नमो शेतकरीचे 6000 असे एकूण 12 हजार रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मिळत आहेत.
दरम्यान या नमो शेतकरीचे आतापर्यंत तीन हप्ते पात्र शेतकऱ्यांना मिळालेले आहेत. नमो शेतकरीचा मागील दुसरा आणि तिसरा हप्ता यवतमाळ येथील कार्यक्रमातून पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हफ्त्यासोबतच पात्र शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला आहे.
दरम्यान आता या योजनेचा पुढील चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार हा मोठा सवाल उपस्थित होत आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या आचारसंहितेमुळे पी एम किसान योजनेचा तथा नमो शेतकरी योजनेचा पुढील हफ्ता शेतकऱ्यांना मिळू शकत नाही.
मात्र आचारसंहिता संपल्यानंतर अर्थातच लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लगेचच या योजनेचे पुढील हफ्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतात असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.
मीडिया रिपोर्ट मधून समोर आलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा आगामी सतरावा हप्ता हा जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे.
म्हणजेच राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान चे 2000 आणि नमो शेतकरी चे दोन हजार असे एकूण चार हजार रुपये जून किंवा जुलै महिन्यात मिळणार आहेत. यामुळे ऐन खरीप हंगामामध्ये राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या पैशांचा खरीप हंगामासाठी उपयोग होईल अशी आशा आहे. तथापि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार या संदर्भात सरकारच्या माध्यमातून कोणतीच अधिकृत अपडेट समोर आलेली नाही.
मात्र दर चार महिन्यांनी या योजनेचे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असल्याने, जून महिन्यात किंवा जुलै महिन्यात शेतकऱ्यांना या योजनेचा पैसा मिळू शकतो असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.
असे झाल्यास मात्र राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे कारण की त्यांना 2000 नाही तर पीएम किसान चे 2000 आणि नमो शेतकरी चे दोन हजार असे एकूण चार हजार रुपये मिळणार आहेत.