Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. खरंतर नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र राज्य शासनाची एक महत्त्वकांक्षी योजना आहे. ही योजना पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे. पी एम किसान योजनेचे जसे स्वरूप आहे तसेच नमो शेतकरीचे देखील स्वरूप आहे.
जे शेतकरी पीएम किसान साठी पात्र आहेत त्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जात आहे. या योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये मिळत आहेत. म्हणजेच पीएम किसान योजनेचे 6000 आणि नमो शेतकरीचे 6000 असे एकूण 12 हजार रुपये राज्यातील पात्र शेतकऱ्यांना दिले जात आहेत.
आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचे तीन हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले असून आगामी चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.
कधी जमा होणार नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हफ्त्यासोबतच नमो शेतकरीचा दुसरा आणि तिसरा हप्ता राज्यातील शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. 28 फेब्रुवारी 2024 ला पी एम किसानचा सोळावा हफ्ता आणि नमो शेतकरीचे दोन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत.
विशेष बाब अशी की, आता नमो शेतकरीचा चौथा हफ्ता हा लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे. जून महिन्यात किंवा जुलैच्या सुरुवातीला या योजनेचा पुढील म्हणजे चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
पीएम किसानचा सतरावा आणि नमो शेतकरीचा चौथा हप्ता सोबतच मिळणार का
खरे तर, गेल्यावेळी म्हणजेच पीएम किसानच्या सोळाव्या हफ्त्या सोबतच नमो शेतकरीचा दुसरा आणि तिसरा आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला होता. यामुळे आता पीएम किसान च्या 17 व्या हफ्त्यासोबतच नमो शेतकरीचा चौथा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे.
जून महिन्यात किंवा जुलै महिन्याच्या सुरुवातीला पीएम किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता एकत्रित रित्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाऊ शकतो असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे. तथापि यासंदर्भात अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
परंतु लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याने पीएम किसानचे 2 हजार आणि नमो शेतकरीचे दोन हजार असे एकूण 4 हजार रुपये लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातील अशी शक्यता आहे.