Namo Shetkari Yojana : तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी देशभरातील करोडो शेतकऱ्यांना एक मोठी भेट दिली. ती म्हणजे पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला. पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्राची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात 2019 मध्ये झाली आहे. या अंतर्गत केंद्रातील सरकारच्या माध्यमातून पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जात आहेत.
परंतु हे 6000 रुपये शेतकऱ्यांना एकरकमी मिळत नाहीत. दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण या ठिकाणी केले जात आहे. आतापर्यंत पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना 17 हप्ते मिळाले आहेत. शेतकऱ्यांसाठी सुरू झालेली ही योजना अल्प कालावधीतच लोकप्रिय ठरली आहे.
यामुळे या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू केली आहे. जे शेतकरी पीएम किसान साठी पात्र आहेत त्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या राज्याच्या योजनेअंतर्गत अतिरिक्त 6000 रुपये मिळत आहेत. या योजनेचे स्वरूप पी एम किसान प्रमाणेच आहे.
म्हणजेच या अंतर्गतही दोन हजाराचा एक हप्ता याप्रमाणे लाभ दिला जात आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे प्रत्येकी सहा हजार रुपये म्हणजेच एकूण 12,000 एका वर्षात मिळतं आहेत. नमो शेतकरी बाबत बोलायचं झालं तर या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत तीन हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत.
या योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्यासोबतच राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले होते. 28 फेब्रुवारीला नमो शेतकरी चा दुसरा आणि तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला.
पी एम किसान चा सोळावा हफ्ता आणि नमो शेतकरीचे दुसरे आणि तिसरे हफ्ते सोबतच राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले असल्याने पीएम किसान च्या 17 व्या हफ्त्यासोबत नमो शेतकरीचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल असे वाटत होते.
मात्र पी एम किसानचा सतरावा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला असतानाही नमो शेतकरी चा पुढील चौथा हप्ता अजून शेतकऱ्यांना मिळालेला नाही. दरम्यान उद्यापासून अर्थात 27 जून पासून राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या पावसाळी अधिवेशनात नमो शेतकरी योजनेसाठी निधीची तरतूद केली जाऊ शकते. पावसाळी अधिवेशनात या योजनेच्या पुढील आपल्यासाठी निधीची तरतूद झाली की मग हा निधी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.
कृषिमंत्री धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पावसाळी अधिवेशनात निधीची उपलब्धता झाल्यानंतर पुढील हप्ता कधी जारी होईल याची तारीख डिक्लेअर केली जाणार आहे. यामुळे या योजनेचा हप्ता आगामी विधानसभा निवडणुका पाहता लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे.
पुढील महिन्यात अर्थातच जुलै महिन्यात या योजनेचा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो. परंतु या संदर्भात अजून शिंदे सरकारकडून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यामुळे याचा लाभ पुढील महिन्यात मिळणार का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.