Namo Shetkari Yojana : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजना ही देखील अशीच एक महत्त्वाकांक्षी सरकारी योजना आहे. ही एक केंद्रीय योजना आहे. या योजनेची सुरुवात 2019 मध्ये झाली आहे. 2019 पासून ही योजना अविरतपणे सुरू आहे.
या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचा लाभ दिला जात आहे. मात्र हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना एकमुस्त मिळत नाहीत. दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण केले जात आहे.
आतापर्यंत पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत एकूण 16 हफ्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे आगामी सतरावा हफ्ता देखील लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.
केंद्रातील याच पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे. या नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेप्रमाणे वार्षिक सहा हजार रुपये दिले जात आहेत.
या योजनेअंतर्गत देखील राज्यातील शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा एक हप्ता मिळतो. म्हणजेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीएम किसानचे सहा हजार आणि नमो शेतकरीचे सहा हजार असे एकूण बारा हजार रुपये मिळतात.
नमो शेतकरी अंतर्गत आतापर्यंत तीन हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. दरम्यान या योजनेचा चौथ्या हफ्त्या संदर्भात देखील एक मोठी माहिती समोर आली आहे. याचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर नेमका कधी जमा होऊ शकतो याबाबत नवीन अपडेट समोर येत आहे.
कधी जमा होणार नमो शेतकरीचा हप्ता
मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर अर्थातच निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर कधीही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाऊ शकतो.
सध्या संपूर्ण देशभर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू आहे. दरम्यान 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे आणि यानंतर ही आचारसंहिता देखील संपणार आहे.
यामुळे लोकसभा निवडणुकीची ही आचारसंहिता संपल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरीच्या चौथ्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा केले जाणार अशी माहिती मीडिया रिपोर्ट मधून समोर येत आहे.
हा चौथा हप्ता जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल असा अंदाज आहे. मात्र, याबाबत अजून सरकारच्या माध्यमातून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तथापि, जर या कालावधीत शेतकऱ्यांच्या खात्यावर या योजनेचा पैसा जमा झाला तर त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.