Nagpur Metro News : नागपूर शहरातील नागरिकांसाठी एक मोठी कामाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. विदर्भातील हे एक महत्त्वाचे शहर आहे. नागपूर जिल्हा आणि नागपुर विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. हे राज्यातील तिसरे सर्वाधिक मोठे शहर म्हणून ओळखले जाते.
दरम्यान, राज्यातील या महत्त्वाच्या शहराचा कायापालट करण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर दरम्यान समृद्धी महामार्ग विकसित केला जात आहे. यासोबतच मुंबई ते नागपूर दरम्यान बुलेट ट्रेन प्रकल्प देखील प्रस्तावित करण्यात आला आहे.
नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग देखील प्रस्तावित करण्यात आला आहे. एकंदरीत विदर्भातील सर्वांगीण विकासासाठी नागपूर शहराचा कायापालट केला जात आहे. विशेष म्हणजे राजधानी मुंबई, सांस्कृतिक राजधानी पुणे या शहराप्रमाणेच उपराजधानी नागपूर मध्ये देखील आता मेट्रोचे जाळे तयार केले जात आहे.
दरम्यान नागपूरकरांच्या जिव्हाळ्याच्या मेट्रोबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार टायगर कॅपिटल ऑफ इंडिया अर्थातच नागपूरमध्ये आता मेट्रोचा विस्तार होणार आहे.नागपूर मध्ये मेट्रोच्या फेज दोनचे काम लवकरच सुरू होणार आहे.
यासाठी सरकार दरबारी हालचाली वाढत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार नागपूर मध्ये मेट्रो फेज दोन अंतर्गत 43.8 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग तयार केला जाणार असून या मार्गात तब्बल 32 स्थानके विकसित होणार आहेत. विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी तब्बल सहा हजार 708 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
कसा असेल मेट्रो Phase 2 ?
मिळालेल्या माहितीनुसार मेट्रो फेज 2 अंतर्गत नागपूर शहरातील खापरीपर्यंतच्या मेट्रोमार्गचा बुटीबोरी शहरापर्यंत विस्तार केला जाणार आहे. ऑटोमोटिव्ह पर्यंतचा मेट्रो मार्ग कन्हान शहरापर्यंत वाढवला जाणार आहे. प्रजापती नगर पर्यंतचा मेट्रो मार्ग कापसी शहरापर्यंत वाढवला जाणार आहे.
लोकमान्य नगर पर्यंतची मेट्रो हिंगणा गावापर्यंत चालवली जाणार आहे. एकूणच काय की मेट्रो फेज दोन अंतर्गत नागपूर शहरातील विविध भागाला मेट्रोची भेट मिळणार आहे. यामध्ये ऑटोमेटिव्ह ते कन्हानदरम्यान 13 किलोमीटर लांबीचा मार्ग विकसित केला जाणार आहे.
तसेच मिहान ते बुटीबोरीदरम्यान 18.7 किमी लांबीचा मेट्रो मार्ग तयार केला जाणार आहे. मेट्रोच्या या विस्तारामुळे नागपुर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होईल आणि नागपूरकरांचा प्रवास आधीच्या तुलनेत आणखी आरामदायी, सुरक्षित आणि जलद होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.