Success Story : भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतात मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. सरकारकडून शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. ज्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे.
आजकाल अनेक तरुण शेतकरी शेती करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. तरुणांमध्ये शेती करण्यासाठी एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. पारंपरिक शेती न करता आधुनिक पद्धतीने शेती करण्यावर तरुण भर देत आहेत. देशातील शेतकरी शेती करताना रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर करताना दिसत आहेत.
रासायनिक शेतीमध्ये खर्च जास्त आणि उतपन्न कमी असे पाहायला मिळत आहे. मात्र आता आजकाल अनेकजण सेंद्रिय शेतीचा अवलंब करताना दिसत आहेत. लक्ष्य डबास हे देशातील असेच एक शेतकरी आहेत जे सेंद्रिय शेती करत आहेत.
दिल्लीतील जाट खोर येथे राहणाऱ्या लक्ष्य डबास या शेतकऱ्याचे परम्परेक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांपेक्षा जास्त आहे. त्यांची वार्षिक उलाढाल सुमारे 7 कोटी रुपये आहे. लक्ष्य डबास हे युट्यूब’ या सोशल प्लॅटफॉर्मवर खूप प्रसिद्ध असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी बनवलेले शेतीविषयक व्हिडीओ लाखो शेतकरी पाहत असतात.
8 मार्च रोजी भारत मंडपम, नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय क्रिएटर्स अवॉर्डमध्ये PM मोदींनी नावीन्यपूर्ण आणि तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी तंत्रज्ञान सुधारण्याच्या कामासाठी लक्ष्य डबास यांना सर्वात प्रभावशाली कृषी-उत्पादक पुरस्कार मिळाला आहे.
हा पुरस्कार लक्ष्य डबास यांच्या भावाने स्वीकारला. यावेळी त्यांनी 30 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना शेतीच्या पद्धती आणि किडीपासून पिकांचे संरक्षण करण्याचे प्रशिक्षण दिल्याचे सांगितले आहे. लक्ष्य डबास यांचा एक स्वतःचा ब्रँड आहे ज्याचे नाव ऑरगॅनिक एकर असे आहे.
गेली 10 वर्षे यशस्वी शेती करत आहे
गेली 10 वर्षांपासून लक्ष्य डबास हे यशस्वी शेती करत आहेत. आजपर्यंत त्यांनी हजारो तरुण शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. लक्ष्य डबास यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, 2016 मध्ये शेती क्षेत्रातील प्रवास सुरु केला. त्यावेळी शेतीविषयक विशेष ज्ञान नव्हते. माझे वडील त्यांच्या सरकारी नोकरीसह 2000 पासून नैसर्गिक शेती करत होते.
2016 मध्ये नैसर्गिक शेती सुरू केली
वडिलांपासून नैसर्गिक शेतीची प्रेरणा घेत त्यांची 2016 पासून सेंद्रिय शेती करण्यास सुरुवात केली. दोन वर्षानंतर भाऊ मृणालही शेती करण्यास मदत करू लागला. त्यानंतर दोघेही हळूहळू शेती करू लागलो. आज सेंद्रिय शेती यशस्वी कशी करावी याचे ते एक उत्तम उदाहरण आहेत. आज हे दोघे भाऊ नैसर्गिक शेतीपासून बनवलेली उत्पादने विकत आहेत.
तरुणांना शेतीचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात
लक्ष्य डबास यांनी सांगितले की, YouTube चॅनेल सुरु करून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. आमच्या स्नेद्रिय शेती करण्याने अनेक तरुण प्रभावित होत गेली. अनेकांची आमच्यासारखी सेंद्रिय शेती करण्याची इच्छा होती. YouTube चॅनेलद्वारे लोकांपर्यंत आमची ओळख वाढत गेली. ऑरगॅनिक एकर असे त्यांच्या YouTube चॅनेलचे नाव आहे.
30 हजारांहून अधिक तरुण आणि शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे
लक्ष्य डबास यांनी सांगितले की, त्यांच्याकडे सुमारे 13 एकर खाजगी जमीन आहे ज्यावर ते शेती करतात. आजपर्यंत त्यांनी 30 हजारांहून अधिक तरुण शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. या शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर 1 लाख एकर जमिनीचे नैसर्गिक शेतीत रूपांतर झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
7 कोटींची वार्षिक उलाढाल
लक्ष्य डबास यांची वार्षिक आर्थिक उलाढाल 7 कोटींहून अधिक आहे. त्यांनी सांगितले की, ते त्यांच्या शेतीमध्ये अनेक प्रकारची औषधी पिके, फळे आणि भाजीपाला, गहू, धान अशी पिके घेतात. त्यांच्या शेतीमध्ये एक पोल्ट्री फार्म देखील आहे ज्यामध्ये ते कोंबड्या पाळतात.
तसेच ते फूड प्रोसेसिंगचे कामही करतात. हजारो शेतकरी त्यांच्याशी निगडीत आहेत ते या शेतकऱ्यांच्या पिकांचे मार्केटिंग देखील करतात. शेती, अन्न प्रक्रिया, पिकांचे मार्केटिंग आणि इतर कामांतून वार्षिक 7 कोटी रुपयांची उलाढाल करत आहेत.