Mustard Crop : निसर्गही अनोखी फुलं देत राहतो. वसंत ऋतूतील मोहरीच्या शेतात हे दृश्य चांगलेच पाहायला मिळत आहे. एकीकडे पीक पक्व होणार आहे, मात्र त्याच पिकात नवीन फुले(Mustard new flowers) आली आहेत. यावेळी अधिक पाऊस (Heavy Rain) आणि वातावरणातील बदलामुळे असे होत असल्याचे कृषी शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. नवीन फुलांच्या शेंगा येईपर्यंत शेतकर्यांनी वाट पाहिली तर आधीच पिकलेल्या शेंगा तुटून पडतील. वेळेवर पीक काढले तर उत्पादन कमी होते. अश्या अडचणीत शेतकरी काही ठिकाणी सापडला आहे.
कृषी विज्ञान केंद्र शामलीचे शास्त्रज्ञ डॉ.विकास मलिक आणि डॉ.ओमकार सिंग यांनी लांक, लिसाध, बहाडीसह अनेक गावांना भेटी देऊन पीक पाहिले आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, मोहरीच्या शेंगा पिकल्यावर एकाच झाडाला पुन्हा नव्याने फुले आली आहेत, असे यापूर्वी कधीच घडले नव्हते. मुझफ्फरनगर, सहारनपूर, मेरठ आणि बुलंदशहरमध्ये शेतकऱ्यांना अशाच समस्यांचा सामना करावा लागत आहे.
शेतकरी हे करतात
कृषी शास्त्रज्ञ डॉ. विकास मलिक यांनी सांगितले की, पिकामध्ये सुमारे 75 टक्के मोहरीच्या शेंगा पिकलेल्याअसल्यास त्यांची काढणी करावी. नवीन फुले पाहून गोंधळून जाऊ नका. नवीन फुलांच्या शेंगा तयार होण्याची वाट पाहू नका, कारण यामुळे उर्वरित संपूर्ण शेंगा गळून पडतील आणि शेतकऱ्याचे मोठे नुकसान होईल.(Farmer Income Loss)
असे का घडले
हवामानात वारंवार होणारा बदल, अतिवृष्टी यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे कृषी शास्त्रज्ञ डॉ.ओंकार सिंग यांनी सांगितले. याला भौतिक बदल म्हणता येईल. पिकावर विविध रोगांचाही प्रादुर्भाव होत असून त्यामुळे पांढरा रोगही आला आहे. मात्र, पिकात असा बदल का झाला, हे अद्याप स्पष्टपणे सांगता येत नाही.