Farmer succes story : शेती (Farming) हा भारतातील एक मुख्य व्यवसाय काळाच्या ओघात या व्यवसायात आता मोठा बदल ही बघायला मिळत आहे.
विशेष म्हणजे काळाच्या ओघात केलेला हा बदल शेतकऱ्यांसाठी विशेष फायदेशीर सिद्ध होत आहे. कोणत्याही क्षेत्रात काळानुरूप बदल अतिशय महत्त्वाचा तसेच शेतीमध्ये देखील काळाच्या ओघात बदल अतिशय महत्त्वाचा.
काळाच्या ओघात आणि परिस्थितीनुसार बदल केला तसेच केलेल्या बदलास योग्य नियोजनाची सांगड घातली तर निश्चितच यश संपादन केले जाऊ शकते.
याला साजेसं असं उदाहरण समोर आला आहे ते उत्तराखंड राज्याच्या राजधानीतून अर्थात देहरादून मधून. मित्रांनो देहरादून मधल्या एका नामांकित आयटी कंपनीत काम करणाऱ्या एका उच्च विद्याविभूषित तरुणीने शेती क्षेत्रात जरा हटके करण्याचा विचार करत मशरूम शेतीच्या (Mushroom Farming) माध्यमातून कोट्यावधी रुपये कमावण्याची किमया साधली आहे.
उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये राहणारी हिरेशा वर्मा आयटी क्षेत्रात काम करत होती. कंपनीत या तरुणीला चांगला पगार देखील होता, पण 2013 मध्ये उत्तराखंडमध्ये आलेल्या पुरामुळे त्यांचे आयुष्य बदलले.
पुरामुळे निराधारांचे हाल पाहून तिने ठरवले की आता गावकऱ्यांमध्ये राहून काही तरी काम करेन. या अनुषंगाने त्यांनी शेतीमध्ये काहीतरी नवीन करण्याचे ठरवले.
मग काय 2013 च्या अखेरीस त्यांनी मशरूमची शेती सुरू केली. आज 2000 हून अधिक लोक त्यांच्याशी जोडले गेले आहेत.
त्यापैकी बहुतांश महिला आहेत. आजच्या घडीला त्यांची वार्षिक उलाढाल दीड कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. हिरेशा सांगतात की, वेगवेगळ्या कल्पनांवर संशोधन केल्यानंतर त्यांना समजले की मशरूमची शेती करणे अधिक चांगले आहे.
मशरूम शेतीचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी हिमाचलच्या मशरूम संशोधन संचालनालयातून एक महिन्याचे प्रशिक्षण घेतले आणि मग घरीच मशरूम शेतीला सुरुवात केली.
प्रशिक्षण घेतल्यानंतर हिरेशा यांनी केवळ 2 हजार रुपये खर्च करून मशरूमची शेती सुरू केली. शेती सुरू केल्यानंतर अवघ्या दोन-तीन महिन्यांनी मशरूम बाजारात विकले.
या पासून तेव्हा पाच हजार रुपये त्यांना मिळाले. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि मग काय त्यांनी मशरूम शेतीची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला.
2000 हून अधिक महिलांना दिला रोजगार पुढच्या वर्षापासून हिरेशाने त्यांच्या मशरूम शेतीची व्याप्ती वाढवली. त्यांनी एका गावात भाड्याने काही जमीन घेतली आणि झोपडीत मशरूम सेटअप लावला.
येथे त्यांनी 500 हून अधिक मशरूमच्या पिशव्या लावल्या. यानंतर त्यांनी गावातील लोकांनाही या अभियानाशी जोडले. त्यांनी शेतकरी आणि महिलांना मोफत मशरूम शेतीचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.
शेतकऱ्यांनाही त्याची मोहीम आवडली आणि हळूहळू त्याच्यासोबत काम करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढू लागली. सध्या 2 हजारांहून अधिक शेतकरी त्यांना जोडून चांगले उत्पन्न मिळवत आहेत.
यातील बहुतांश महिला या कुठल्या-न-कुठल्या संकटाचा सामना करून बाहेर पडल्या आहेत. यामुळे या महिलांना रोजगार मिळाला असून त्याच्या संसाराला मोठा हातभार लागला आहे.
हिरेशा सांगतात की, पूर्वी असा समज होता की मशरूमची लागवड फक्त हिवाळ्यातच केली जाऊ शकते, पण तसे नाही. आता एसी आणि कुलर लावून उन्हाळ्यातही मशरूमची लागवड करता येते.
तथापि, त्याचे सेटअप सेट करण्यासाठी महत्त्वपूर्ण रकमेची आवश्यकता असेल. हिरेशा यांनी स्वतः बँकेकडून कर्ज घेऊन एसी रुम सेटअप करून घेतला.
याचा फायदा असा झाला की तिने ऑयस्टर मशरूमसह बटन, मिल्की, क्रेमिनी अशा अनेक प्रकारचे मशरूम शेती करण्यास सुरुवात केली.
सध्या ते दररोज एक टन मशरूमचे उत्पादन घेत आहेत. हिरेशा सांगतात की त्यांनी हॅनाग्रोकेअर नावाने एक कंपनी रजिस्टर केली आहे.
आता त्या मशरूमवर प्रक्रिया करत आहेत आणि लोणचे, चहा, कॉफी, पापड, सूप असे पदार्थ मशरूमपासून तयार करत आहेत.
विशेष म्हणजे ते ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्लॅटफॉर्म वापरून मार्केटिंग करत आहेत. अनेक किरकोळ विक्रेते त्यांच्याशी आता जोडले गेले आहेत.
देशात कुठूनही ऑर्डर आल्यावर हिरेशा यांची कंपनी उत्पादन पुरवत आहे. यामुळे आजच्या घडीला सुमारे दीड कोटींची वार्षिक उलाढाल होते.