Mumbai Water Taxi : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात प्रदूषणाचा स्तर दिवसेंदिवस वाढत आहे. वाढते प्रदूषण पर्यावरणासाठी घातक ठरत आहे. वायु प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, जलं प्रदूषण यामुळे पर्यावरण धोक्यात आले आहे. प्रदूषणाचा स्तर वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. यात वाढती वाहन संख्या देखील एक महत्त्वाचे कारण आहे. वाहनांमधून निघणाऱ्या धुरामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे.
राजधानी मुंबईमध्ये देखील वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वायूप्रदूषण होत आहे. हेच कारण आहे की, आता मुंबईमधील प्रदूषणाचा स्तर कमी करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून खाजगी वाहनांचा कमीत कमी वापर व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शिवाय सार्वजनिक वाहतुकीमध्ये देखील अमुलाग्र बदल केले जात आहेत.
सार्वजनिक वाहतुकीमध्ये उपयोगात आणली जाणारी वाहनांपासूनही कमी प्रदूषण व्हावे यासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न होत आहेत. याचाच एक भाग म्हणून अलीकडे इलेक्ट्रिक बसेस मोठ्या प्रमाणात सुरू केल्या जात आहेत. रेल्वे वाहतुकीचा विचार केला तर डिझेलवर चालणाऱ्या रेल्वे ऐवजी इलेक्ट्रिक रेल्वे चालवण्याला प्राधान्य दिले जात आहे.
एवढेच नाही तर आता मुंबईमधील प्रदूषण कमी करण्यासाठी चक्क समुद्रावर इलेक्ट्रिक टॅक्सी चालवली जाणार आहे. यामुळे आता फक्त रस्त्यांवरच टॅक्सी धावणार नाही तर समुद्रावर देखील टॅक्सी सुसाट धावणार आहे. राजधानी मुंबई सह मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सात महत्त्वाच्या मार्गांवर इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी सुरू केली जाणार आहे.
इन्फिनिटी हार्बर सर्व्हिसकडून चार इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सीसह ही सेवा पुरवली जाणार आहे. पुढल्या महिन्यापासून अर्थातच डिसेंबर पासून ही सेवा सुरू होईल असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे. दरम्यान या चार वॉटर टॅक्सी पैकी दोन वॉटर टॅक्सी 24 सीटर आणि दोन वॉटर टॅक्सी 12 सीटर राहणार आहेत.
कोणत्या मार्गावर धावणार Water Taxi ?
इन्फिनिटी हार्बर सर्व्हिसने दिलेल्या माहितीनुसार कंपनीला मुंबईसह बेलापूर येथून एलिफंटा, नेरुळ, कारंजा, रेवस, वाशी, जेएनपीटी बंदर, ऐरोलीसाठी इलेक्ट्रिक टॅक्सी चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे. यापैकी बेलापूर ते एलिफंटा या मार्गावर आधीच ही सेवा सुरु आहे.
मात्र उर्वरित 7 मार्गांवरही पुढील महिन्यापासून इलेक्ट्रिक टॅक्सीची सेवा सुरू होणार असल्याचे चित्र तयार होत आहे. खरंतर मुंबई ते बेलापूर दरम्यान याआधीही वॉटर टॅक्सी कंपनीच्या माध्यमातून चालवली जात होती. पण डिझेलवर चालणारी वॉटर टॅक्सी ही खडकावर आदळली जात होती.
म्हणून या मार्गावरील Water टॅक्सी बंद करण्यात आली आहे. पण नवीन इलेक्ट्रिक वॉटर Taxi आकाराने लहान असते. यामुळे नवीन Taxi चा थोडासा भागच पाण्याखाली जाणार आहे. म्हणून ही नवीन बोट खडकावर आदळणार नाही.
सध्या ट्रायल सुरु आहे
सध्या या वॉटर टॅक्सीचे कोची आणि गोव्यात ट्रायल सुरू असून लवकरच या बोटी मुंबईमध्ये येणार आहेत. पुढील महिन्यात ट्रायल पूर्ण होईल आणि त्यानंतर लगेचच मुंबईमध्ये या बोटी दाखल होतील. या बोटीने मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास फक्त एका तासात पूर्ण होईल असा दावा केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या बेलापूर ते एलिफंटा, मांडवा आणि अलिबाग दरम्यान वॉटर टॅक्सी सेवा सुरू आहे.
दरम्यान, पुढील महिन्यात आणखी काही महत्त्वाच्या मार्गावर ही सेवा सुरू होणार आहे. निश्चितच ही वाहतूक सेवा सुरू झाली तर मुंबईकरांसाठी ही आनंदाची बाब ठरणार आहे. यामुळे प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यास मदत होणार आहे सोबतच प्रवाशांचा प्रवास आधीच्या तुलनेत अधिक गतिमान होणार आहे.