मुंबई ते पुणे प्रवास होणार स्वस्त आणि जलद ! ‘या’ मार्गावर सुरु होणार वंदे साधारण ट्रेन, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Vande Sadharan Train : पाच वर्षांपूर्वी भारतीय रेल्वेमध्ये एक ऐतिहासिक घटना घडली. ती म्हणजे देशात पहिल्यांदाच संपूर्ण भारतीय बनावटीची हायस्पीड ट्रेन सुरू झाली. वंदे भारत ट्रेन ही भारतीय बनावटीची हाय स्पीड ट्रेन पाच वर्षांपूर्वी अर्थातच 2019 मध्ये वाराणसी ते नवी दिल्ली या मार्गावर सुरू करण्यात आली.

तेव्हापासून ते आजतागायत ही गाडी देशातील 34 महत्त्वाच्या रेल्वे मार्गांवर सुरू झाली आहे. 34 वंदे भारत ट्रेन सध्या स्थितीला देशभरात सुरू असून या गाड्यांना प्रवाशांच्या माध्यमातून अभूतपूर्व असे प्रेम दाखवले जात आहे. प्रवाशांचा वाढणारा रिस्पॉन्स पाहता विविध मार्गांवर ही गाडी चालवण्यासाठी भारतीय रेल्वेने नियोजन आखले आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

शिवाय पुढल्या वर्षी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत, या चालू वर्षाच्या अखेरीस पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत तसेच पुढल्या वर्षी आपल्या महाराष्ट्रात देखील विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये लोकप्रिय ठरलेली ही गाडी देशातील विविध मार्गांवर सुरू होणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार मार्च 2024 पर्यंत 75 वंदे भारत ट्रेन सुरु होणार आहेत. पण या गाडीला चांगला रिस्पॉन्स मिळत असला तरी या गाडीचे तिकीट दर सर्वसामान्यांना परवडत नाही असा ओरड पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांकडून ही गाडी फक्त उच्चवर्गीयांसाठी सुरू झाली आहे असा आरोप केला जात आहे.

यामुळे सर्वसाधारण रेल्वे प्रवाशांना देखील वंदे भारत एक्सप्रेस सारख्याच सोयी सुविधा मिळाव्यात आणि त्यांना देखील वंदे भारत एक्सप्रेसच्या जलद प्रवासाचा अनुभव मिळावा यासाठी वंदे साधारण ट्रेन सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. दरम्यान, याच वंदे साधारण ट्रेन संदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर आली आहे.

ती म्हणजे वंदे साधारण ट्रेनचा प्रोटोटाईप तयार झाला आहे. एवढेच नाही तर ही गाडी चाचणीसाठी चेन्नई येथील कोच फॅक्टरीमधून बाहेर देखील पडली आहे. शनिवारी अर्थातच 28 ऑक्टोबर 2023 रोजी ही ट्रेन मुंबईतील मध्य रेल्वेच्या वाडी बंदर यार्डात दाखल झाली आहे. आता या वंदे साधारण ट्रेनच्या चाचण्या घेतल्या जाणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार मुंबई ते पुणे आणि इगतपुरी ते कासारा यादरम्यानच्या घाट सेक्शन मध्ये या गाडीच्या चाचण्या होणार आहेत. यामुळे ही गाडी मुंबई ते पुणे मार्गावर देखील सुरू होऊ शकते अशा चर्चा आता रंगल्या आहेत.

तसेच काही मीडिया रिपोर्टमध्ये या गाडीच्या घाट सेक्शन मध्ये चाचण्या पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते दिल्ली आणि मुंबई ते पटना या दोन मार्गावर ही गाडी चालवली जाऊ शकते असा दावा केला जात आहे. यामुळे आता भविष्यात कोणत्या मार्गावर ही गाडी धावणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.