आनंदाची बातमी ! मुंबईला लवकरच मिळणार पहिल्या स्लीपर वंदे भारत एक्सप्रेसची भेट, कोणत्या मार्गांवर धावणार ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Vande Bharat Express : भारतात रेल्वेच्या प्रवासाला विशेष पसंती मिळते. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास जलद सुरक्षित आणि आरामदायी व्हावा यासाठी भारतीय रेल्वेच्या माध्यमातून वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत.

रेल्वेने नुकत्याच काही वर्षांपूर्वी प्रवाशांना आरामदायी प्रवास करता यावा यासाठी वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची हायस्कूल ट्रेन लॉन्च केली. ही गाडी सध्या देशातील 34 महत्त्वाच्या मार्गांवर सुरू आहे.

ही गाडी 2019 मध्ये सर्वप्रथम रुळावर धावली होती. तेव्हापासून या गाडीची लोकप्रियता हळूहळू वाढतच आहे. राजधानी आणि शताब्दी एक्सप्रेस पेक्षा या गाडीला प्रवाशांनी अधिक पसंती दाखवली आहे.

म्हणूनच की काय केंद्र शासनाच्या माध्यमातून देशात 2017 पर्यंत 4500 वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनीच ही माहिती दिली आहे.

विशेष म्हणजे वंदे भारत एक्सप्रेसच्या या घवघवीत यशानंतर गदगद झालेल्या रेल्वेच्या माध्यमातून आता वंदे भारत एक्सप्रेसची स्लीपर आवृत्ती देखील तयार करण्यात आली आहे. स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस ही देखील लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

विशेष असे की, देशाला मिळणारी पहिली स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस ही आपल्या महाराष्ट्रातून धावणार आहे. देशाची आर्थिक राजधानी अर्थातच मुंबई ते राष्ट्रीय राजधानी दिल्ली दरम्यान ही पहिली स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार अशी माहिती प्रतिष्ठित वृत्त संस्थेच्या माध्यमातून समोर आली आहे.

वास्तविक मुंबई ते दिल्ली दरम्यान रोजाना हजारो नागरिक प्रवास करत असतात. हा लांब पल्ल्याचा प्रवास असल्याने रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. दैनंदिन कामानिमित्त तसेच पर्यटनासाठी या दोन्ही शहरा दरम्यान हजारो प्रवासी प्रवास करतात.

सध्या स्थितीला या दोन्ही शहरादरम्यांचा प्रवास करण्यासाठी प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र आता या मार्गावर स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असल्याने प्रवाशांचा प्रवास आरामदायी तर होणारच आहे शिवाय जलद गतीने त्यांना प्रवास करता येणार आहे.

ही स्लीपर भारत ट्रेन 160 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावणार आहे. यामुळे सध्या या मार्गावरील रेल्वे ट्रॅक मजबूत केले जात आहेत. ज्या ठिकाणी रेल्वे ट्रॅक अधिक वळणदार आहेत ते रेल्वे ट्रॅक सरळ केले जात आहेत.

दरम्यान या सर्व कामांना आणखी काही महिन्यांचा काळ लागणार आहे. यामुळे देशातील पहिली स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्यासाठी आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा