शेवटी निर्णय झालाच ! ‘या’ तारखेला मुंबईला मिळणार आणखी एका वंदे भारत एक्सप्रेसची भेट, पंतप्रधान दाखवणार हिरवा झेंडा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Vande Bharat Express : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई मधील सर्वसामान्य जनतेसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी मुंबईला लवकरच आणखी एका वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे.

ही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मराठवाड्यातील जालना ते मुंबई दरम्यान चालवली जाणार आहे. खरे तर, मराठवाड्यातील हजारो नागरिक दैनंदिन कामानिमित्त मुंबईला येत असतात.

मराठवाड्यातून विशेषता जालना शहरातून मुंबईला येणाऱ्या नागरिकांची संख्या ही खूपच उल्लेखनीय आहे.

हेच कारण आहे की मुंबई ते जालना व्हाया छत्रपती संभाजी नगर अशी वंदे भारत एक्सप्रेस चालवली पाहिजे अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून जोर धरत होती.

दरम्यान नागरिकांची ही मागणी आता पूर्ण झाली असून मुंबई-छत्रपती संभाजी नगर-जालना वंदे भारत एक्सप्रेस आता लवकरच रेल्वे ट्रॅकवर धावणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 30 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

यामुळे जालनासह छत्रपती संभाजी नगर येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे मुंबई ते जालना हा प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित होणार आहे.

विशेष बाब म्हणजे या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यासाठी मध्य रेल्वेकडे या गाडीचे रेक देखील पोहचले आहेत. यामुळे 30 डिसेंबरला या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस सुरू होऊ शकते अशी दाट शक्यता आहे.

जर ही गाडी नियोजित वेळेत सुरू झाली तर निश्चितच नवीन वर्षात मराठवाड्यातील सर्वसामान्य नागरिकांना वंदे भारत एक्सप्रेस ने मुंबईकडील प्रवास करता येणार आहे. त्यामुळे सध्या मराठवाड्यातील नागरिकांमध्ये मोठे समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

थापि, या गाडीचे वेळापत्रक कसे राहील, ही गाडी कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेईल याबाबत अद्याप कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा