मुंबई ट्रांस हार्बर लिंक प्रकल्पाबाबत महत्वाची अपडेट ! एमएमआरडीएने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Trans Harbour Link : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईमध्ये विविध रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. खरंतर गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईमध्ये लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

वाढत्या लोकसंख्येमुळे शहरातील पायाभूत सुविधेवर आता मोठा ताण पडू लागला आहे. प्रामुख्याने दळणवळण व्यवस्थेवर वाढत्या लोकसंख्येचा सर्वात जास्त ताण पाहायला मिळत आहे. यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.

दरम्यान या वाहतूक कोंडीवर उतारा म्हणून आता शहरात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पाची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामध्ये मुंबई ट्रांस हार्बर लिंक प्रकल्पाचा देखील समावेश होतो. हा प्रकल्प राज्य शासनाचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.

या प्रकल्पाला भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी जी यांचे नाव देण्यात आले होते. हा अटल सेतू प्रकल्प 25 डिसेंबर 2023 रोजी सर्वसामान्यांसाठी सुरू केला जाणार होता. मात्र या प्रकल्पाचे या नियोजित वेळेत काम पूर्ण होणार नसल्याचे चित्र आहे.

यामुळे आता या प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा लांबणीवर पडला आहे. आता हा प्रकल्प नवीन वर्षातच सुरू होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे.

याबाबत राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामाची माहिती दिली आहे. फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकल्प जानेवारीअखेरपर्यंत सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे.

दरम्यान या प्रकल्पाबाबत एमएमआरडीए अर्थातच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. एमएमआरडीएने या प्रकल्पाच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमणार आहे.

यासाठी सोळा लाख रुपये खर्च केले जाणार असून निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही निविदा भरण्यासाठी इच्छुकांना 5 जानेवारी 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे आता हा प्रकल्प लवकरच सर्वसामान्यांच्या सेवेत येणार असा आशावाद व्यक्त होत आहे. 

कसा आहे प्रकल्प

या प्रकल्पांतर्गत शिवडी ते न्हावा शेवा दरम्यान सागरी सेतू तयार केला जाणार आहे. 21.8 किलोमीटर लांबीचा हा सागरी सेतू असून यापैकी 16 किलोमीटर लांबीचे अंतर हे समुद्रावर राहणार आहे. उर्वरित पूल मात्र जमिनीवर तयार होणार आहे.

हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अटल सेतू हा भारतातील समुद्रावरील सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू म्हणून ओळखला जाणार आहे. या सागरी सेतूसाठी जवळपास 18 हजार कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा