Mumbai Traffic News : मुंबईकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे शहरातील वाहतूक व्यवस्थेत एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा बदल करण्यात आला आहे. शहरातील वाहतूक 10 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर दरम्यान माऊंट मेरी यात्रेच्या निमित्ताने बदलण्यात आली आहे.
या यात्रेच्या निमित्ताने शहरात वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू नये, नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी 17 सप्टेंबर पर्यंत सकाळी सहा वाजेपासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत शहरातील काही भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला असल्याची माहिती मुंबई ट्रॅफिक पोलीस यांच्या माध्यमातून समोर आली आहे. याबाबत मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून महत्त्वाची माहिती दिली आहे.
मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलवर दिलेल्या माहितीनुसार, 10-9-2023 ते 17-9-2023 या कालावधीमध्ये सकाळी सहा ते रात्री 11 या वेळेत माऊंट मेरी रोड, परेरा रोड, केन रोड, हिल रोड, माऊंट कार्मेल रोड, चॅपेल रोड, जॉन बॅप्टीस्ट रोड, सेंट सॅबेस्टीन रोड, रिबेलो रोड, डॉ पिटर डायस रोड, सेंट पॉल रोड वर रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने पार्क करण्यास आणि थांबवण्यास मनाई करण्यात आली आहे.
या सदर कालावधीत प्रवाशांच्या चढण्या उतरण्याकरता जितका वेळा आवश्यक आहे तेवढा वगळता या ठिकाणी सर्व प्रकारची वाहने पार्क करण्यास, थांबवण्यास मनाई करण्यात आली आहे. यासोबतच या यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरातील काही मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. आता आपण शहरातील कोणते मार्ग या कालावधीत बंद राहणार याबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत.
कोणते मार्ग राहणार बंद
मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माउंट मेरी रोड हा या कालावधीत स्थानिक पासधारक रहिवाशांची तसेच पोलीस व इतर आपात्कालीन वाहने वगळता इतर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे.
तसेच केन रोड हा माउंट मेरी रोडपासून पुढे बी जे रोड पर्यंत स्थानिक पासधारक रहिवाशांची वाहने तसेच आपत्कालीन वाहने वगळता इतर सर्व प्रकारच्या वाहनांकरीता एक दिशा मार्ग असेल म्हणजेच बी जे रोड पासून या मार्गावर प्रवेश बंद राहणार आहे.
यासोबतच या यात्रेच्या निमित्ताने परेरा रोड हा पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्याकरिता एक दिशा मार्ग असेल म्हणजेच बीजे रोड पासून या मार्गावर प्रवेश बंद करण्यात आला आहे.
सेंट जॉन बॅप्टीस्ट रोड हा स्थानिक पासधारक रहिवाशांची वाहने तसेच आपातकालीन वाहने वगळता इतर सर्व प्रकारच्या वाहनानकरिता या कालावधीमध्ये बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई ट्रॅफिक पोलीसांनी घेतला आहे.
याशिवाय कारमेल चर्च या ठिकाणी चॅपल रोड कडून वेरोनिका रोड कडे जाण्याकरिता असलेले उजवे वळण या कालावधीमध्ये बंद करण्याचा निर्णय मुंबई ट्राफिक पोलिसांनी घेतला आहे.
https://twitter.com/MTPHereToHelp/status/1700480144027398146?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1700480144027398146%7Ctwgr%5Ec537983ca5d7f0f9a897ef5a393cbfdf45f093bd%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F