Mumbai Pune Travel Time : मुंबई, पुणे आणि नासिक या तीन शहरांना महाराष्ट्राचा सुवर्ण त्रिकोण म्हणून ओळखल जात आहे. ही शहरे महाराष्ट्राच्या एकात्मिक विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहेत.
हेच कारण आहे की, शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून या तिन्ही शहरांच्या विकासासाठी सामूहिक प्रयत्न केले जात आहेत. या तिन्ही शहरांदरम्यानचा प्रवास गतिमान व्हावा यासाठी विविध प्रकल्पांची कामे हाती घेतली जात आहेत.
नासिक ते पुणे दरम्यानचा प्रवास जलद आणि गतिमान व्हावा यासाठी सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. हा रेल्वे मार्ग अहमदनगर मार्गे प्रस्तावित करण्यात आला आहे. सध्या स्थितीला या रेल्वेमार्गाचे काम काही तांत्रिक कारणांमुळे रखडले आहे.
मात्र या रेल्वे मार्गासाठी पुणे आणि नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी भूसंपादन पूर्ण झाले आहे. दरम्यान आता मुंबई ते पुणे हा प्रवास देखील गतिमान होणार आहे. खरे तर मुंबई ही महाराष्ट्राची राज्य राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी आहे.
पुण्याला शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते आणि ही राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे. अशा परिस्थितीत या दोन्ही शहरा दरम्यान शैक्षणिक कामानिमित्त आणि रोजगाराच्या शोधात ये-जा करणाऱ्या नागरिकांची संख्या खूपच मोठी आहे.
दरम्यान दररोज पुणे ते मुंबई आणि मुंबई ते पुणे असा प्रवास करणाऱ्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे आता लवकरच हा प्रवास 90 मिनिटात पूर्ण होणार आहे.
सुरु होणार हा प्रकल्प
हाती आलेल्या माहितीनुसार मुंबई शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हाती घेण्यात आलेला मुंबई मधील एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प लवकरच सुरू होणार असे वृत्त समोर आले आहे.
खरे तर या प्रकल्पांतर्गत 22 किलोमीटर लांबीचा सागरी ब्रिज तयार केला जात आहे. हा ब्रिज शिवडी ते न्हावा शेवादरम्यान विकसित होत असून यामुळे मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास वेगवान होणार आहे. हा देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू राहणार आहे.
यामुळे मुंबई आणि नवी मुंबई ही शहरे परस्परांना जोडली जाणार आहेत. सध्या मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास करायचा असेल तर जवळपास एका तासाचा वेळ खर्च करावा लागतो. पण जेव्हा हा ब्रिज सुरु होईल तेव्हा हा प्रवास अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांच्या काळात पूर्ण होईल.
केव्हा सुरू होणार एमटीएचएल प्रकल्प
आतापर्यंत एमटीएचएल प्रकल्प 25 डिसेंबर 2023 रोजी अर्थातच दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी सुरू होईल असे सांगितले जात होते. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प 25 डिसेंबरला सुरू होणे अशक्य असल्याचे सांगितले आहे.
फडणवीस यांनी सांगितले की हा प्रकल्प दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिनानिमित्त सुरू करण्याचा शासनाचा मानस होता. मात्र या कालावधीमध्ये हा प्रकल्प सुरू होणे शक्य आहे. यामुळे आता शासनाने हा प्रकल्प जानेवारी 2024 अखेरपर्यंत सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याचे टार्गेट ठेवले आहे.
पुणे मुंबई प्रवास होणार 90 मिनिटात
खरे तर सध्या मुंबईहून पुण्याला जायचे असेल तर पी. डी. मेलो रोडवरून फ्रीवे, मग त्यानंतर सायन पनवेल द्रुतगती महामार्ग, मग मुंबई पुणे द्रुतगती मार्ग असा केला जात आहे. यामुळे मात्र नागरिकांचा प्रवास वेळ खाऊ झाला आहे.
शिवाय मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील होत आहे. पण जेव्हा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प सुरू होईल तेव्हा पी डी मेलो रोडवरून फ्रीवे त्यानंतर मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पावरून चिरले मार्गाने मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर दाखल होता येणार आहे.
म्हणून मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पामुळे मुंबई ते पुणे हा प्रवास 90 मिनिटात पूर्ण होणार असे बोलले जात आहे.