Mumbai To Pune Travel : मुंबई ते पुणे आणि पुणे ते मुंबई असा दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की 2024 ची सुरुवात मुंबईकरांसाठी आणि नवी मुंबईकरांसाठी खूपच खास राहिली आहे.
कारण की, नवीन वर्षाची सुरुवात झाली आणि मुंबईकरांना देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू प्रकल्पाची भेट मिळाली. अटल सेतू अर्थात शिवडी ते न्हावा शेवा दरम्यान विकसित झालेला देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू आता वाहतुकीसाठी सुरू झाला आहे.
या प्रकल्पामुळे मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास सुसाट झाला आहे. अशातच आता अटल सेतू अर्थातच मुंबई ट्रान्स हार्बर लींक प्रकल्पा संदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे.
खरंतर मुंबई ट्रान्स हार्बर लिंक सुरू झाल्यामुळे आता मुंबईहून पुण्याला प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळू लागला आहे. मुंबईहुन नवी मुंबई आणि त्यापुढे पुण्याकडील प्रवास आता सोयीचा झाला आहे.
तथापि, अजूनही अटल सेतूपासून पुढे मुंबई-पुणे एक्सप्रेस वे पर्यंतचा प्रवास करताना सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय.
पण आता सर्वसामान्यांची ही अडचण लवकरच दूर होणार आहे.भविष्यात अटल सेतूपासून पुढील मुंबई-पुणे एक्सप्रेस वे पर्यंतचा प्रवास देखील जलद होणार आहे.
म्हणजे निकटच्या भविष्यात मुंबई ते पुणे हा प्रवास जलद गतीने होणार अशी आशा व्यक्त होऊ लागली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अटल सेतू प्रकल्पाच्या पुढील टप्प्याच्या बांधकामास देखील आता मंजुरी मिळालेली आहे.
सागरी सेतूच्या चिर्ले येथील जोडणी पुलाच्या अर्थात अटल सेतूच्याच पुढील टप्प्याच्या बांधकामासाठी मंजुरी मिळाली असल्याची मोठी माहिती समोर येत आहे.
या अटल सेतूच्या पुढील टप्प्यामुळे मुंबई-पुण्यातील अंतर आणखी कमी होणार आहे. अटल सेतूच्या या जोडणी पुलाच्या बांधकामासाठी तब्बल 10 अब्ज रुपयांचा खर्च होईल अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे या प्रकल्पाचे काम सुरु झाल्यानंतर अवघ्या 30 महिन्यात याचे काम पूर्णत्वास येईल अशी आशा व्यक्त होत आहे. त्यामुळे आता या प्रकल्पाचे प्रत्यक्षात काम केव्हा सुरू होणार हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.