Mumbai Shirdi Vande Bharat Train : आज दुपारी 3 वाजता मध्य रेल्वे विभागाच्या ताफ्यात दोन वंदे भारत ट्रेनची भर पडणार आहे. दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करकमलाद्वारे सीएसएमटी ते साईनगर शिर्डी आणि सीएसएमटी ते सोलापूर या दोन वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण होणार आहे.
मुंबई शिर्डी या ट्रेन बाबत जर बोलायचं झालं तर यामुळे राजधानी मुंबईहून साई दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची मोठी सोय होणार आहे. सध्या स्थितीला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हुन थेट शिर्डी साठी कोणतीही रेल्वे धावत नाही.
अशा परिस्थितीत ही ट्रेन साई भक्तांसाठी आनंदाची पर्वणी राहणार आहे. दरम्यान या ट्रेनची कसारा घाटात नुकत्याच काही दिवसांपूर्वी चाचणी पार पडली. या चाचणीत ही गाडी अपेक्षेपेक्षा तीन ते चार मिनिट आधीच कसारा ते इगतपुरी असा प्रवास करण्यास सक्षम ठरली. आम्ही आपणास सांगू इच्छितो की चाचणी दरम्यान वंदे भारत ट्रेन अवघ्या 22 मिनिटात कसारा ते इगतपुरी यादरम्यान चा प्रवास करण्यास सक्षम राहिली.
विशेष म्हणजे घाट सेक्शन मध्ये ही ट्रेन विना बँकर धावण्यास सक्षम आहे. त्यामुळे वंदे भारत ट्रेनच्या स्पीडवर आणि सुरक्षिततेवर शिक्कामोर्तब झाला आहे. पूर्णपणे भारतीय बनावटीची ही स्वदेशी ट्रेन सध्या देशात अस्तित्वात असलेल्या इतर एक्सप्रेसच्या तुलनेत गतिमान असून यामुळे आतां राजधानी मुंबईहून शिर्डी चा प्रवास वेगवान होण्यास मदत होणार आहे.
जाणकार लोकांच्या मते या ट्रेनमुळे मुंबईहून शिर्डी साठी दर्शनाला जाणाऱ्या भाविकांचे साईबाबांचे वनडे दर्शन होणार आहे. आज नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई साईनगर शिर्डी व्यतिरिक्त मुंबई सोलापूर या वंदे भारत चे देखील उद्घाटन होणार आहे. ही ट्रेन पुणे मार्गे धावणार असल्याने सोलापूर समवेतच पुणेकरांना देखील या ट्रेनचा फायदा होणार आहे.
मुंबई-शिर्डी अन मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनच वेळापत्रक | Vande Bharat Express Timetable