Mumbai Railway News : नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईहून विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. खरंतर नववर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण गोव्याला अन कोकणात जाण्याचा प्लॅन बनवतात. हीच गोष्ट लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून मुंबईवरून विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस – कोचुवेली दरम्यान ही विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार असून या गाडीमुळे कोकणात आणि गोव्याला जाणाऱ्या लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
तुम्हालाही नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्याला जायचे असेल तर तुमच्यासाठी या ट्रेनचा पर्याय बेस्ट ठरणार आहे. दरम्यान आज आपण या ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार यासंदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कस राहणार वेळापत्रक
लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोचुवेली दरम्यान चालवल्या जाणाऱ्या विशेष एक्सप्रेस ट्रेन च्या चार फेऱ्या होणार आहेत. दि. १९.१२.२०२४ ते दि. ०९.०१.२०२५ या काळात ही विशेष गाडी दर गुरुवारी १६.०० वाजता मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सोडली जाणार आहे आणि कोचुवेली येथे दुसऱ्या दिवशी २२.४५ वाजता पोहोचणार आहे.
तसेच कोचुवेली ते लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष एक्सप्रेस ट्रेन दि. २१.१२.२०२४ ते दि. ११.०१.२०२५ या दरम्यान चालवली जाणार आहे. या काळात ही गाडी दर शनिवारी कोचुवेली येथून १६.२० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी ००.४५ वाजता पोहोचणार आहे.
म्हणजेच या देखील विशेष ट्रेनच्या चार फेऱ्या होणार आहेत. अर्थातच या विशेष एक्सप्रेस ट्रेनच्या एलटीटी ते कोचुवेली दरम्यान चार फेऱ्या आणि कोचुवेली ते एलटीटी दरम्यान चार खऱ्या अशा एकूण आठ फेऱ्या होणार आहेत.
कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ही विशेष गाडी या मार्गावरील ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी, करमळी, मडगाव जंक्शन, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मूकनबिका रोड,
बाय कुंदापुरा, उडुपी, सुरतकल, ठोकूर, मंगळुरु जंक्शन, कासारगोड, कन्नूर, कालिकत, तिरूर, शोरानूर, थ्रिसूर, एर्नाकुलम टाउन, कोट्टायम, तिरुवल्ला, चेंगन्नूर, मावेलिकारा, कायनकुलम आणि कोल्लम या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.