Mumbai Railway News : वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील संपूर्ण भारतीय बनावटीची हायस्पीड ट्रेन आहे. या गाडीची सुरुवात 2019 मध्ये झाली. सर्वप्रथम ही गाडी राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली ते वाराणसी यादरम्यान सुरू झाली. यानंतर मग टप्प्याटप्प्याने देशातील अनेक महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत देशातील 51 महत्वाच्या मार्गांवर ही गाडी धावत आहे. विशेष बाब म्हणजे यातील आठ मार्ग आपल्या महाराष्ट्रातून जातात.
राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, नागपूर ते बिलासपुर, इंदोर ते नागपूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव या 8 मार्गांवर ही गाडी भरधाव वेगाने सुरू आहे. एकंदरीत राज्यात आता वंदे भारत एक्सप्रेसचे जाळे विणले जात आहे.
विशेष म्हणजे आगामी काळात महाराष्ट्राला आणखी काही नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आलेल्या माहितीनुसार, मार्च अखेरपर्यंत महाराष्ट्राला आणखी सहा नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळू शकते. त्यातील चार गाड्या या पुण्याला मिळणार आहेत.
पुणे ते बेळगाव, पुणे ते बडोदा, पुणे ते सिकंदराबाद आणि पुणे ते शेगाव या चार गाड्या पुण्याला मिळतील. याशिवाय मुंबई ते कोल्हापूर आणि मुंबई ते शेगाव या मार्गावर देखील वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्याची शक्यता मीडिया रिपोर्ट मध्ये वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान मुंबईकरांसाठी वंदे भारत एक्सप्रेस संदर्भातच एक मोठी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे मुंबई ते मडगाव अर्थातच मुंबई ते गोवा या मार्गावर सुरू असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसला मिळणारी पसंती पाहता आता लवकरच या ट्रेनचे डबे वाढवले जाऊ शकतात.
या गाडीमुळे मुंबईहून कोकणात तसेच गोव्याला जाणाऱ्यांचा प्रवास खूपच सुपरफास्ट झाला आहे. तसेच गोवा आणि कोकणातून मुंबईला येणाऱ्यांना देखील वंदे भारत एक्सप्रेसमुळे जलद गतीने राजधानीचे दर्शन घेता येणे शक्य होत आहे.
सुरुवातीला या गाडीचे तिकीट दर पाहता या गाडीला प्रतिसाद मिळणार नाही असे बोलले जात होते. आता मात्र ही आठ डब्यांची गाडी हाउसफुल होत असल्याने अन अनेकांना या गाडीने प्रवास करण्यासाठी तिकीट मिळत नाहीये, वेटिंगवर राहावे लागत आहे.
त्यामुळे ही ट्रेन 16 डब्यांची झाली पाहिजे अशी मागणी आहे. या संदर्भात कोकण रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी महोदय यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या दिवसापासून मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसला मागणी आहे.
विशेष म्हणजे आता या गाडीच्या तिकिटासाठी अक्षरशः प्रतीक्षा यादी तयार करावी लागत आहे. म्हणून पुढे या गाडीचे डबे वाढवण्याचा विचार करावा लागणार आहे, पण त्यासाठी डब्यांची उपलब्धतेसह इतर बाबींचा विचार करावा लागेल.
अर्थातच जनसंपर्क अधिकारी महोदय यांनी या गाडीचे डबे वाढवण्याचे संकेत दिलेले आहे. त्यामुळे भविष्यात ही गाडी 16 डब्ब्यांची पाहायला मिळू शकते. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना निश्चितच या गाडीचा आणखी फायदा होणार आहे.