मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी ! ‘या’ ट्रेन होणार रद्द, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Railway News : मुंबईमधील चाकरमान्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. राजधानी मुंबईत धावणाऱ्या लोकलला मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखले जाते. मात्र या लाईफ लाईन मधून प्रवास करताना प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय.

वेळेवर लोकल न येणे, लोकलचा वेग कमी असणे यांसारख्या वेगवेगळ्या कारणांमुळे लोकलचा प्रवास हा आव्हानात्मक बनत चालला आहे. याशिवाय लोकल गाड्यांमध्ये कायमच तोबा गर्दी होत असल्याने अपघात होण्याची शक्यता देखील नाकारून चालत नाही. मात्र चाकरमान्यांना दैनंदिन प्रवासासाठी लोकल शिवाय दुसरा पर्याय नाही.

हेच कारण आहे की लोकलमध्ये नेहमीच गर्दी पाहायला मिळते. दरम्यान पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या लोकल बाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार 19 आणि 20 डिसेंबरला पश्चिम रेल्वे मार्गावर तीन तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. हा ब्लॉक आज मध्यरात्री 1 : 41 पासून ते पहाटे 4 : 40 पर्यंत राहणार आहे.

गोखले पुलाच्या कामासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. परिणामी ब्लॉक कालावधीमध्ये काही लोकल गाड्या रद्द केल्या जाणार आहेत. लोकलच्या आठ फेऱ्या रद्द होणार आहेत तर तीन लोकल उशिराने धावणार आहेत. यामुळे निश्चितच पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना थोडा काळ अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

कोणत्या लोकल गाड्या होणार रद्द?

विरार येथून आज रात्री दहा वाजता सुटणारी विरार अंधेरी लोकल रद्द केली जाणार आहे.

अंधेरी येथून 4:25 वाजता सुटणारी अंधेरी विरार लोकल रद्द राहणार आहे.

या ब्लॉकमुळे वांद्रे येथून चार वाजून पाच मिनिटांनी सुटणारी वांद्रे-बोरिवली लोकल सुद्धा रद्द राहणार आहे.

बोरिवली येथून चार वाजून 53 मिनिटांनी सुटणारी बोरिवली-चर्चगेट लोकल देखील या ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर रद्द केली जाणार आहे.

वसई रोड रेल्वे स्थानकावरून सव्वा अकरा वाजता सुटणारी वसई रोड-अंधेरी लोकल देखील या ब्लॉकमुळे रद्द राहणार आहे.

अंधेरी रेल्वे स्थानकावरून चार वाजून चार मिनिटांनी सुटणारी अंधेरी-विरार लोकल यामुळे रद्द केली जाणार आहे.

अंधेरी रेल्वे स्थानकावरून चार वाजून पाच मिनिटांनी सुटणारी अंधेरी-चर्चगेट लोकल देखील रद्द होणार आहे.

चर्चगेट येथून 00.32 वाजता सुटणारी चर्चगेट-विलेपार्ले लोकल देखील या ब्लॉकमुळे रद्द राहणार आहे.

याशिवाय विरार येथून साडेतीन वाजता सुटणारी विरार-चर्चगेट लोकल 15 मिनिटे उशिराने धावणार आहे. तसेच बोरिवली येथून चार वाजून पाच मिनिटांनी सुटणारी बोरिवली चर्चगेट लोकल पंधरा मिनिटे उशिराने धावणार आहे. विरार येथून तीन वाजून 35 मिनिटांनी सुटणारी विरार-बोरिवली लोकल देखील दहा मिनिटे उशिराने धावणार अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून समोर आली आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा