Mumbai Railway News : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई येथील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ही बातमी मुंबईहून खानदेशकडे आणि खान्देशहुन मुंबईकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अधिक खास ठरणार आहे. खरंतर जळगाव, भुसावळसहित संपूर्ण खानदेशमधून मोठ्या प्रमाणात नागरिक दैनंदिन कामानिमित्त मुंबईला जात असतात.
या मार्गावर नेहमीच मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत असते. हेच कारण आहे की, मुंबई सेंट्रल ते भुसावळ दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान सध्या सुरू असलेल्या उन्हाळी सुट्ट्यांमुळे आणि सणासुदीच्या दिवसांमुळे मुंबई सेंट्रल ते भुसावळ या विशेष एक्सप्रेस ट्रेनला प्रवासी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दाखवत आहेत. या गाडीमध्ये प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
आगामी काळात या मार्गावर आणखी गर्दी वाढण्याची शक्यता आहे. परिणामी मध्य रेल्वेने मुंबई सेंट्रल ते भुसावळ दरम्यान सुरू असलेल्या विशेष एक्सप्रेस ट्रेनला मुदतवाढ देण्याचा मोठा निर्णय नुकताच घेतलेला आहे.
या निर्णयामुळे मुंबई आणि खानदेश मधील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, आता आपण या विशेष गाडीला कोणत्या तारखेपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतलेला आहे याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
खरेतर सेंट्रल रेल्वेने मुंबई सेंट्रल ते भुसावळ ही विशेष एक्सप्रेस ट्रेन 30 एप्रिल 2024 पर्यंत चालवण्याचा निर्णय घेतलेला होता. आता मात्र या गाडीला मुदतवाढ मिळाली असून ही गाडी आता 30 जून 2024 पर्यंत धावणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून समोर आली आहे.
दुसरीकडे भुसावळ ते मुंबई सेंट्रल ही विशेष गाडी एक मे 2024 पर्यंत चालवली जाणार होती आता मात्र ही गाडी एक जुलै 2024 पर्यंत चालवली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
साहजिकच मध्य रेल्वेने घेतलेल्या निर्णयामुळे मुंबई ते भुसावळ आणि भुसावळ ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान आता आपण या गाडीला कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा दिला जात आहे याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
मुंबई सेंट्रल ते भुसावळ विशेष एक्सप्रेस ट्रेनचे अधिकृत थांबे खालीलप्रमाणे
सेंट्रल रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार या विशेष एक्सप्रेस ट्रेन ला या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे.
ही गाडी बोरिवली, बोईसर, वापी, वलसाड, नवसारी, भेस्तान, बारडोली, व्यारा, नवापूर, नंदुरबार, दोंडाईचा, सिंदखेडा, नरडाणा, अमळनेर, धरणगाव आणि जळगाव या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. अप आणि डाऊन या दोन्ही मार्गांवरील गाड्यांना या सदर रेल्वे स्थानकांवर थांबा राहणार हे विशेष.