Mumbai Railway News : एप्रिलचा महिना सुरू आहे आणि महाराष्ट्रावर सूर्यदेव कोपले आहेत. राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान 41 अंश सेल्सिअस पार पोहोचले आहे. अशातच सध्या उन्हाळी सुट्ट्या, लग्नसराई आणि सणासुदीचा हंगाम या पार्श्वभूमीवर रेल्वे गाड्यांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
यामुळे प्रवाशांना वाढत्या उकाड्याचा आणि रेल्वे गाड्यांमध्ये होत असलेल्या गर्दीचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, रेल्वे प्रवाशांची हिच अतिरिक्त गर्दी लक्षात घेता आता रेल्वे प्रशासनाने काही विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वे प्रशासनाने देखील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहता काही विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वे पनवेल ते छपरा दरम्यान देखील विशेष गाडी चालवणार आहे.
या गाडीचा पनवेल, कल्याण येथील प्रवाशांना फायदा होणार आहे. शिवाय या उन्हाळी विशेष ट्रेनचा उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना सुद्धा मोठा फायदा होणार आहे. या गाडीला महाराष्ट्रातील चार महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा राहणार आहे.
यामुळे राज्यातील प्रवाशांना या उन्हाळी विशेष गाडीचा मोठा फायदा होईल असे बोलले आहे. अशा परिस्थितीत आता आपण या विशेष गाडीचे वेळापत्रक थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार वेळापत्रक
पनवेल ते छपरा ही विशेष उन्हाळी गाडी 19 एप्रिल ते 28 जून या कालावधीत चालवली जाणार आहे. या कालावधीत ही गाडी पनवेल रेल्वे स्थानकावरून दर शुक्रवारी रात्री नऊ वाजून 40 मिनिटांनी रवाना होणार आहे आणि तिसऱ्या दिवशी छपरा रेल्वे स्थानकावर सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचणार आहे.
म्हणजे ही गाडी आठवड्यातून एक दिवस धावणार आहे. दुसरीकडे छपरा ते पनवेल ही उन्हाळी विशेष गाडी 18 एप्रिल ते 27 जून या कालावधीत चालवली जाणार आहे.
या कालावधीत ही गाडी दर गुरुवारी छपरा रेल्वे स्थानकावरून दुपारी तीन वाजून वीस मिनिटांनी रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी रात्री आठ वाजून 30 मिनिटांनी ही गाडी पनवेलला पोहोचणार आहे. या गाडीच्या पनवेल ते छपरा आणि छपरा ते पनवेल अशा प्रत्येकी 11 म्हणजेच 22 फेऱ्या होणार आहेत.
कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार
मध्य रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार या विशेष गाडीला कल्याण, इगतपुरी आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक रोड, भुसावळ या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे.
तसेच ही गाडी इटारसी, जबलपुर, कटनी, सतना, प्रयागराज, बनारस, वाराणसी, ज्ञानपुर शहर आणि बलिया या स्थानकावर देखील थांबणार आहे.