Mumbai Railway News : भारतात रेल्वे मार्गाने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. रेल्वेने करोडो लोक प्रवास करतात. देशभरातील कानाकोपऱ्यात रेल्वेचे जाळे पसरलेले आहे. रेल्वेचा प्रवास हा सुरक्षित आणि खिशाला परवडणारा असल्याने सर्वसामान्यांमध्ये हा प्रवास अधिक लोकप्रिय आहे.
दरम्यान कोकण रेल्वे मार्गावरील प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे. हे अपडेट मुंबई मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी देखील अधिक खास राहणार आहे. कोकण रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार कोकण रेल्वे मार्गावर पाच आणि सात सप्टेंबर रोजी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.
हा ब्लॉक देखभालीच्या कामासाठी घेतला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. 5 सप्टेंबरला चिपळूण ते करंजाडी दरम्यान हा ब्लॉक घेतला जाईल. पाच सप्टेंबर म्हणजेच मंगळवारी दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी ते तीन वाजून वीस मिनिटांनी हा ब्लॉक घेतला जाणार आहे.
या ब्लॉकमुळे तीन गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. यामुळे कोयंबतूर ते जबलपूर दरम्यान धावणारी गाडी मडगाव ते चिपळूण दरम्यान सुमारे दीड तास उशिराने धावणार अशी माहिती समोर आली आहे.
तसेच सावंतवाडी रोड ते दिवा जंक्शन एक्सप्रेस ही सावंतवाडी रोड ते चिपळूण दरम्यान सुमारे दीड तास उशिराने धावणार अशी माहिती समोर आली आहे. याशिवाय लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते तिरुवनंतपुरमदरम्यान धावणारी सेंट्रल नेत्रावती एक्सप्रेस कोलाड ते वीर दरम्यान सुमारे अर्धा तास उशिराने धावणार आहे.
यासोबतच सात सप्टेंबरला म्हणजे गुरुवारी कोकण रेल्वे मार्गावर सेनापुरा ते ठोकर दरम्यान दुपारी तीन वाजेपासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे मंगळुरू सेंट्रल ते मडगाव जंक्शन दरम्यान धावणारी मेमो एक्सप्रेस मंगळुरू सेंट्रल या स्थानकावरून सुमारे सव्वा तास उशिराने धावणार आहे.
तसेच मंगरूळ जंक्शन ते मुंबई सेंट्रल ही एक्सप्रेस मंगळुरू जंक्शन येथून जवळपास एक तास उशिराने धावणार आहे. निश्चितच या ब्लॉकमुळे या रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.