मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी ! ऐन सणासुदीच्या काळात ‘या’ रेल्वे गाड्या उशिराने धावणार, रेल्वे प्रवाशांची डोकेदुखी वाढणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Railway News : मुंबईमध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. ही अपडेट राजधानीच्या शहरात वसलेल्या रेल्वे प्रवाशांसाठी अधिक खास राहणार आहे. सध्या महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात सणासुदीचा हंगाम सुरू आहे. सध्या नवरात्र उत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. सर्वत्र दांडिया, गरबा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे नवरात्र उत्सवाची रंगत वाढली आहे.

आज अर्थातच 24 ऑक्टोबर 2023 रोजी नवरात्र उत्सवाची सांगता होणार आहे. आज विजयादशमी सण साजरा होणार असून आज नवरात्र उत्सव संपणार आहे. मात्र असे असले तरी सणासुदीचा हा हंगाम आज संपेलच असे नाही. कारण की, पुढल्या महिन्यात दिवाळीचा मोठा सण येणार आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून आत्तापासूनच तयारी  केली जात आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दिवाळीचा सण जवळ आला असल्याने आतापासूनच खरेदी वाढली आहे. रेल्वे प्रवास  देखील वाढला आहे. रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. अशातच मुंबईमध्ये रेल्वे प्रवाशांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे 26 ऑक्टोबर रोजी कोकण रेल्वे मार्गावर एक मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.

26 तारखेला सकाळी साडेसात ते साडेदहा वाजेच्या कालावधीमध्ये हा ब्लॉक घेतला जाईल अशी माहिती कोकण रेल्वे कडून देण्यात आली आहे. कोकण रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण ते संगमेश्वर रोड या रेल्वेस्थानकांच्या दरम्यान मालमत्तेच्या देखभालीसाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे.

यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील काही रेल्वे गाड्या उशिराने धावणार आहेत. परिणामी या मार्गावरील रेल्वे प्रवाशांना थोडा काळ अडचणींचा सामना करावा लागणार आहे. या ब्लॉकमुळे तब्बल तीन गाड्यांच्या वेळापत्रकावर विपरीत परिणाम होईल आणि गाड्या उशिराने धावतील असे सांगितले जात आहे. दरम्यान, आता आपण या ब्लॉकमुळे कोणत्या गाड्या उशिराने धावतील याविषयी थोडक्यात पण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या गाड्यां उशिराने धावणार?

कोकण रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, 25 ऑक्टोबरला सुटणारी गाडी क्र. ०११३९ नागपूर – मडगाव जंक्शन ही गाडी या ब्लॉकमुळे उशिराने धावणार आहे. ही गाडी कोलाड ते चिपळूण या स्थानकांच्या दरम्यान १०० मिनिटे नियंत्रित वेगाने चालवली जाईल असे सांगितले जात आहे. 

तसेच 26 ऑक्टोबरला सुटणारी गाडी क्र. १२०५१ CSMT- मडगाव जंक्शन जनशताब्दी एक्सप्रेस ही गाडी या ब्लॉकमुळे उशिराने धावणार आहे. ही गाडी कोलाड ते चिपळूण या स्थानकांच्या दरम्यान ४० मिनिटे नियंत्रित वेगाने चालवली जाईल असे कोकण रेल्वेने स्पष्ट केले आहे.

याशिवाय, 25 ऑक्टोबर रोजी सुटणारी गाडी क्र. १६३४६ थिरूवअनंतपूरम् – लोकमान्य टिळक नेत्रावती एक्सप्रेस सुद्धा उशिराने धावणार आहे. ही गाडी रत्नागिरी ते संगमेश्वर या स्थानकांच्या दरम्यान ४० मिनिटे नियंत्रित वेगाने चालवली जाईल असे कोकण रेल्वेने यावेळी नमूद केले आहे.