गुड न्युज ! मुंबईहून सुटणाऱ्या ‘या’ सहा एक्सप्रेस गाड्यांना आता कसारा स्थानकावर मिळणार थांबा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Railway News : राजधानी मुंबईहुन उत्तर भारत, मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करतात. मुंबईसोबतच कसारा येथून देखील या भागात मोठ्या प्रमाणात प्रवास केला जातो. दरम्यान कसारा इथून उत्तर भारत, मराठवाडा आणि विदर्भात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे.

ही बातमी कसारा येथील रेल्वे प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, कसारा रेल्वे स्थानकावर मध्य रेल्वेने सहा नवीन एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याचा अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या निर्णयामुळे कसारा इथून प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असल्याचा आशावाद व्यक्त केला जात आहे. खरतर कसारा हे एक महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. मात्र या रेल्वे स्थानकात काही एक्सप्रेस गाड्यांना मध्य रेल्वेने थांबा दिलेला नव्हता.

आता मात्र या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकात सहा एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यात आला आहे. यामुळे कसारा रेल्वे स्थानकाचे महत्व वाढणार असून येथील रेल्वे प्रवाशांचा या निर्णयामुळे फायदा होणार आहे. आता आपण कोणत्या एक्सप्रेस गाड्यांना कसारा इथे थांबा मिळाला आहे हे जाणून घेणार आहोत.

कोणत्या एक्सप्रेस गाड्यांना मिळाला थांबा ?

मध्य रेल्वेने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार, आता कसारा स्थानकामध्ये एलटीटी-शालिमार एक्स्प्रेस, छत्रपती शिवाजी महाराज स्थानक ते नांदेड तपोवन एक्स्प्रेस, छत्रपती शिवाजी महाराज स्थानक ते जालना जनशताब्दी एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस ते पाटणा एक्स्प्रेस, छत्रपती शिवाजी महाराज स्थानक ते मनमाड पंचवटी एक्स्प्रेस आणि छत्रपती शिवाजी महाराज स्थानक ते नांदेड राज्यराणी एक्स्प्रेस या एकूण 6 एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यात आला आहे.

केव्हापासून लागू होणार निर्णय

मध्य रेल्वेने कसारा रेल्वे स्थानकात या सहा गाड्यांना थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, याची अंमलबजावणी आजपासून अर्थातच 23 ऑगस्ट 2023 पासून केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. निश्चितच मध्य रेल्वेचा हा निर्णय प्रवाशांसाठी मोठा फायद्याचा राहणार आहे.