मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी ! शहरातील ‘हे’ नऊ मेट्रो मार्ग 2026 आधीच पूर्ण होणार, कोणता मार्ग केव्हा सुरू होणार ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Railway News : मुंबई शहरात आणि उपनगरात गेल्या काही वर्षांपासून मोठी वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य नागरिकांना शहरात प्रवास करणे खूपच आव्हानात्मक बनत चालले आहे.

अशा परिस्थितीत शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून वेगवेगळी विकास कामे हाती घेण्यात आली आहेत.

मुंबई शहरातील आणि उपनगरातील रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतूक आता मजबूत बनवली जात आहे. रेल्वे वाहतूक मजबूत बनवण्यासाठी मुंबईची लाईफ लाईन लोकलचा विस्तार केला जात आहे.

सोबतच एसी लोकल चालवल्या जात आहे. शिवाय आता शहरात मेट्रो देखील सुरू होत आहे. सध्या स्थितीला शहरातील दोन मेट्रो मार्ग सुरू असून 9 मार्ग प्रस्तावित आहेत.

दरम्यान या प्रस्तावित नऊ मेट्रो मार्गांबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. याबाबत केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी लोकसभेत महत्वाची माहिती दिली आहे.

पुरी यांनी सांगितल्याप्रमाणे, शहरातील सर्वच्या सर्व नऊ मार्ग 2024 पर्यंत पूर्ण होतील आणि यावर प्रत्यक्षात वाहतूक सुरू होऊ शकणार आहे. म्हणजेच येत्या तीन वर्षात शहरातील प्रस्तावित सर्व मेट्रो मार्गांवर मेट्रो धावणार असा अंदाज आहे.

त्यामुळे येत्या काही वर्षांमध्ये मुंबई शहरातील आणि उपनगरातील नागरिकांचा प्रवास आधीच्या तुलनेत अधिक जलद, सुरक्षित होईल अशी आशा आहे.

कोणते मार्ग केव्हा सुरू होणार

केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटल्याप्रमाणे, मुंबई मेट्रो लाइन-३ हा मार्ग जून २०२४ पर्यंत पूर्ण होईल. मुंबई मेट्रो लाइन-२बी हा मार्ग जून २०२५ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

तसेच मुंबई मेट्रो लाइन-४, मुंबई मेट्रो लाइन-४ ए, मुंबई मेट्रो लाइन-६ आणि मुंबई मेट्रो लाइन-९/७ ए हे मेट्रोमार्ग डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होतील अशी माहिती त्यांनी दिली आहे.

शिवाय मुंबई मेट्रो लाइन-४ (जून २०२६) तर मुंबई मेट्रो लाइन-१० आणि मुंबई मेट्रो लाइन १२ हा ऑक्टोबर २०२६ मध्ये पूर्ण होईल अशी आशा आहे. 

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा