रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मुंबईहून धावणाऱ्या ‘या’ एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात होणार बदल, कारण काय?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Railway News : मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उद्या सात सप्टेंबर रोजी कोकण रेल्वे मार्गावर काही तांत्रिक कामांसाठी घेण्यात येणाऱ्या ब्लॉकमुळे मुंबईहून धावणाऱ्या काही एक्सप्रेस गाड्यांचे वेळापत्रक बदलणार आहे. नागपूरकडे जाणाऱ्या गाडीचे देखील यामुळे वेळापत्रक बिघडणार आहे.

यामुळे राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर येथील रेल्वे प्रवाशांच्या प्रवासाचे नियोजन बिघडणार असे बोलले जात आहे. रेल्वेने याबाबत माहिती दिली आहे. कोकण रेल्वेने सांगितल्याप्रमाणे उद्या सात सप्टेंबर अर्थातच गुरुवारी चिपळूण ते संगमेश्वर रोड विभागा दरम्यान दुरुस्तीच्या आणि देखभालीच्या कामासाठी तीन तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

उद्या सकाळी साडेसात वाजेपासून ते साडेदहा वाजेपर्यंत हा ब्लॉक राहणार आहे. या कालावधीमध्ये या मार्गावरील काही महत्त्वाच्या गाड्यांच्या वेळापत्रकात मोठा बदल होणार आहे. या मार्गावरील तीन गाड्यांच्या वेळापत्रकात बदल होणार अशी माहिती कोकण रेल्वेने यावेळी दिली आहे.

या मार्गावरील काही गाड्यांचा प्रवास ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर चाळीस मिनिटांपासून ते एक तास 40 मिनिटांपर्यंत उशिराने होणार आहे. आता आपण कोकण रेल्वे मार्गावर घेतल्या जाणाऱ्या या ब्लॉकमुळे कोणत्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल होणार याबाबत जाणून घेणार आहोत.

1)नागपूर ते मडगाव जंक्शन दरम्यान धावणाऱ्या विशेष गाडीचा 6 सप्टेंबर रोजी सुरू होणारा प्रवास ब्लॉक कालावधीत कोलाड-चिपळूण विभागादरम्यान एक तास 40 मिनिटांसाठी थांबवला जाणार आहे. अर्थातच या गाडीचा प्रवास या ब्लॉकमुळे जवळपास पावणे दोन तास उशिराने होणार आहे.

2)छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या गाडीला ब्लॉक कालावधीत कोलाड ते चिपळूण या विभागादरम्यान चाळीस मिनिटांसाठी थांबवले जाणार आहे. याचाच अर्थ या गाडीचा प्रवास चाळीस मिनिटांनी उशिरा होणार आहे.

3)तिरुवनंतपुरम सेंट्रल ते लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई म्हणजेच नेत्रावती एक्सप्रेसचा प्रवास ब्लॉक कालावधीत रत्नागिरी-संगमेश्वर रोड विभागात चाळीस मिनिटांसाठी थांबवला जाणार आहे. म्हणजे या गाडीचा प्रवास 40 मिनिटे उशिराने होईल.