मुंबई, ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ‘या’ लोकल ट्रेनच्या फेऱ्या होणार रद्द, पहा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Railway News : मुंबईच्या लाईफ लाईन बाबत म्हणजेच लोकल बाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वे मार्गावर आणि हार्बर रेल्वे मार्गावर शनिवारी रात्री आणि रविवारी तांत्रिक कामांसाठी ब्लॉक घेतला जाणार आहे.

विविध अभियांत्रिकी कामासाठी घेण्यात येणाऱ्या या ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर मुंबईमधील काही लोकल फेऱ्या ब्लॉक कालावधीत रद्द राहणार आहेत. तर काही फेऱ्या दुसऱ्या मार्गावर वळवल्या जाणार आहेत. अशा परिस्थितीत रविवारी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना थोडा काळ अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यामुळे प्रवाशांचा प्रवास खोळंबणार आहे. दरम्यान आता आपण मध्य रेल्वेवर आणि हार्बर रेल्वे मार्गावर केव्हा ब्लॉक घेतला जाईल आणि या ब्लॉकमुळे कोणत्या लोकल फेऱ्या रद्द होतील याबाबत थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

मध्य रेल्वे मार्गावर ब्लॉक केव्हा घेतला जाणार?

रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, ठाणे स्थानकावर सीएसएमटी च्या दिशेकडे फलाट क्रमांक दोन/तीन वर पादचारी पुलाच्या कामासाठी ब्लॉक घेतला जाणार आहे. या पुलाचे चार गर्डर्स लावण्यात येणार असल्याने शनिवारी मध्य रात्री हा ब्लॉक घेतला जाणार आहे. आज 2 सप्टेंबर 2023 रोजी रात्री 12:30 वाजेपासून ते रविवारी पहाटे साडेपाच वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे.

या ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर अकरा वाजून बारा मिनिटांनी सीएसएमटी ते ठाणे ही लोकल सुटल्यानंतर रविवार सकाळ पर्यंतच्या सर्व लोकल रक्त राहणार आहेत. ब्लॉक नंतर अप दिशेकडील पहिली लोकल रविवारी सकाळी 5 वाजून 21 मिनिटांनी कल्याण ते सीएसएमटी हे लोकल सुटणार आहे. ब्लॉक नंतर डाऊन दिशेकडील पहिली लोकल सकाळी 6 वाजून 23 मिनिटांनी विद्याविहारवरून टिटवाळ्यासाठी सुटणार आहे.

याशिवाय उद्या मध्य रेल्वेवरील माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी ब्लॉक घेतला जाणार आहे. उद्या तीन सप्टेंबर 2023 रोजी या मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 पर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर सीएसएमटी डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे.

मात्र ठाण्याच्या पुढे या जलद लोकल डाऊन जलद मार्गावर वळवल्या जाणार आहेत. तसेच ठाणे येथून अप जलद मार्गावरील लोकल सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. त्यानंतर माटुंग्यानंतर पुन्हा अप जलद मार्गावर या लोकल वळवल्या जाणार अशी माहिती देण्यात आली आहे.

हार्बर मार्गावर ब्लॉक केव्हा घेतला जाणार 

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार उद्या तीन सप्टेंबर 2023 रोजी हार्बर मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे. हा ब्लॉक मानखुर्द-नेरुळ अप आणि डाऊन मार्गावर घेतला जाईल. उद्या सकाळी 11.15 ते सायंकाळी 4.15 या काळात ब्लॉक घेतला जाणार असून या ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बेलापूर दरम्यान धावणाऱ्या डाऊन लोकल सेवा रद्द केल्या जाणार आहेत.

तसेच बेलापूरहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान सुटणाऱ्या अप लोकल सेवा रद्द केल्या जाणार आहेत. मात्र या ब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मानखुर्द दरम्यान स्पेशल लोकल चालवल्या जाणार आहेत. तसेच रेल्वे प्रवाशांना ठाणे-वाशी, नेरुळ स्थानकांवरील ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल सेवा देखील प्रवाशांसाठी उपलब्ध राहणार अशी माहिती रेल्वेने यावेळी दिली आहे.