मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! गोव्याचा प्रवास होणार सुपरफास्ट, रेल्वे ‘या’ मार्गावर चालवणार विशेष एक्सप्रेस ट्रेन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Railway News : नववर्ष सुरू होण्यासाठी मात्र 15 ते 16 दिवसांचा काळ बाकी आहे. चालू वर्षाला निरोप देऊन आता आपण सर्वजण नवीन वर्षात प्रवेश करणार आहोत. दरम्यान नवीन वर्षाच्या आणि नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी वाढण्याची शक्यता आहे.

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि नाताळ सणाच्या सेलिब्रेशन साठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्रातून गोव्याला जाणाऱ्यांची संख्या खूपच अधिक राहण्याची शक्यता आहे. दरवर्षी नववर्ष स्वागतासाठी मुंबईहून हजारो नागरिक गोव्याला जात असतात.

शिवाय ख्रिसमस अर्थातच नाताळ सेलिब्रेट करण्यासाठी देखील गोव्याला जाणाऱ्यांची संख्या उल्लेखनीय आहे. अशा परिस्थितीत नववर्ष आणि नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. ही संभाव्य गर्दी पाहता मध्य रेल्वेने एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे.

या नवीन निर्णयानुसार मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. नवी मुंबई येथील पनवेल रेल्वे स्थानकावरून ते गोव्यातील मडगाव रेल्वे स्थानकादरम्यान मध्य रेल्वेच्या माध्यमातून 14 विशेष एक्सप्रेस गाड्या चालवल्या जाणार आहेत.

विशेष म्हणजे या गाड्यांसाठीचे आरक्षण देखील येत्या काही दिवसात सुरू होईल अशी शक्यता आहे. दरम्यान आता आपण या रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसं असणार वेळापत्रक ?

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, पनवेल-मडगाव विशेष एक्सप्रेस ट्रेनच्या सहा फेऱ्या होणार आहेत. 22, 23, 24 आणि 29, 30 आणि 31 डिसेंबरला ही गाडी पनवेल रेल्वे स्थानकावरून 21:10 वाजता रवाना होईल आणि मडगाव जंक्शनला दुसऱ्या दिवशी 6:50 वाजता पोहचणार आहे.

तसेच 22, 23, 24 आणि 29, 30, 31 डिसेंबरला मडगाव-पनवेल विशेष एक्सप्रेस ट्रेन मडगाव जंक्शन येथून सकाळी आठ वाजता रवाना होईल आणि 20:15 वाजता पनवेल रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.

याशिवाय, एक जानेवारी 2024 ला मडगाव जंक्शन ते पनवेल विशेष एक्सप्रेस ट्रेन मडगाव जंक्शन येथून 21:00 वाजता रवाना होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 7:20 वाजता पनवेल रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. तसेच 2 जानेवारी 2024 ला पनवेल ते मडगाव जंक्शन विशेष एक्सप्रेस ट्रेन ही पनवेल रेल्वे स्थानकावरून 8:20 वाजता रवाना होईल आणि मडगाव जंक्शन येथे 21:30 वाजता पोहोचणार आहे.

कुठे राहणार थांबा

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ही विशेष एक्सप्रेस ट्रेन रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. 

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा