मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहुन ‘या’ शहरासाठी सुरू धावणार विशेष ट्रेन, मध्य रेल्वेने दिली मोठी अपडेट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Railway News : मुंबईमधील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर आली आहे. ही बातमी राजधानी मधील क्रिकेट प्रेमींसाठी अधिक खास ठरणार आहे.

खरं तर सध्या संपूर्ण देशभरात क्रिकेट वर्ल्ड कपची क्रेज पाहायला मिळत आहे. विश्वचषकामुळे सर्वत्र क्रिकेटचा फिव्हर पाहायला मिळत आहे. उद्या अर्थातच 19 नोव्हेंबर 2023 रोजी क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे.

हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे रंगणार आहे. पहिल्या सेमी फायनलचा विजेता संघ भारत आणि दुसरा सेमी फायनल विजेता संघ ऑस्ट्रेलिया यांच्यात ही लढाई होणार आहे.

भारताने लीग स्टेज मधील 9 सामने आणि सेमी फायनलचा एक सामना असे दहा सामने जिंकून फायनल मध्ये एन्ट्री घेतली आहे. सेमी फायनल मध्ये भारताने न्यूझीलंडला नमवले आहे.

दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने सुरुवातीचे दोन सामने गमावल्यानंतर स्ट्रॉंग कमबॅक करत सेमी फायनल मध्ये वर्ल्ड कपची प्रबल दावेदार असलेल्या साऊथ आफ्रिका टीमचा पराभव करत फायनलचा टप्पा गाठला आहे. 2003 नंतर प्रथमच वर्ल्ड कपच्या फायनल मध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारत आमने-सामने पाहायला मिळणार आहेत.

यामुळे फायनलची मोठी क्रेज पाहायला मिळत आहे. तब्बल 12 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भारताकडे तिसऱ्यांदा वर्ल्ड कप फायनल जिंकण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. तर ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा विश्वचषक फायनल जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

त्यामुळे फायनलचा हा मुकाबला कडाक्याचा होणार आहे. दरम्यान फायनलची ही मॅच पाहण्यासाठी राजधानी मुंबईहून हजारोंच्या संख्येने क्रिकेटप्रेमी अहमदाबाद मध्ये दाखल होणार आहेत.

फायनल मॅचची सर्व तिकिटे विकली गेली आहेत. जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर उद्या एक लाख दहा हजार क्रिकेट प्रेमी फायनलचा सामना पाहण्यासाठी हजेरी लावणार आहेत. दरम्यान मुंबई येथील क्रिकेट प्रेमींसाठी मध्य रेल्वेने विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई ते अहमदाबाद दरम्यान उद्याच्या सामन्यासाठी एक विशेष गाडी चालवली जाणार आहे. वर्ल्ड कप स्पेशल ट्रेन म्हणून ही गाडी चालवली जाणार आहे. ही गाडी राजधानी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणार आहे.

आता आपण या गाडीचे वेळापत्रक थोडक्यात जाणून घेणार आहोत तसेच या गाडीला कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा मिळणार आहे याबाबत देखील सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत.

कसं राहणाऱ या गाडीचे वेळापत्रक 

मध्य रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार, आज अर्थातच १८ नोव्हेंबरला मुंबई येथून ही गाडी सोडली जाणार आहे. ही गाडी सीएसएमटीवरुन आज रात्री साडेदहा वाजता अहमदाबादकडे रवाना होईल आणि उद्या अर्थातच सामन्याच्या दिवशी ही गाडी सकाळी 6:40 मिनिटांनी अहमदाबाद रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.

तसेच परतीच्या प्रवासात ही गाडी सामना झाल्याच्या दुसऱ्या दिवशी अर्थातच 20 नोव्हेंबरला अहमदाबाद येथून रात्री १.४५ वाजता मुंबईकडे रवाना होईल आणि सकाळी 10:35 वाजता CSMT ला पोहचणार आहे. 

कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार?

मध्य रेल्वेने सांगितल्याप्रमाणे ही विशेष गाडी दादर, ठाणे, वसई, सुरत, वडोदरा, अहमदाबाद या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. क्रिकेट विश्वचषकासाठी सुरू करण्यात आलेली ही विशेष गाडी मुंबईमधील क्रिकेट प्रेमींना खूपच दिलासा देणारी ठरणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा