मुंबई, नागपूर मधील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज ! सुरू होणार स्पेशल ट्रेन, कसा असणार टाईम टेबल आणि रूट ? वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Railway News : सणासुदीच्या काळात राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ही बातमी मुंबई आणि नागपूरमधील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक खास राहणार आहे. खरंतर, राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन शहरादरम्यान रोजाना हजारो प्रवासी प्रवास करत असतात.

सणासुदीच्या दिवसांमध्ये तर या दोन शहरादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूपच वाढते. या मार्गांवर सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते. दरम्यान सणासुदीच्या काळात होणारी ही प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहता रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यानुसार मुंबई ते नागपूर दरम्यान स्पेशल ट्रेन चालवली जाणार आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे. खरंतर पुढील महिन्यात दिवाळीचा सण येणार आहे. 12 नोव्हेंबर पासून यंदा दिवाळी सुरू होणार आहे. 12 नोव्हेंबर पासून ते 15 नोव्हेंबर पर्यंत दिवाळी सेलिब्रेट केली जाणार आहे. 12 नोव्हेंबर रोजी दीपावली, 14 नोव्हेंबरला दीपावली पाडवा, बलिप्रतिपदा आणि 15 नोव्हेंबर रोजी भाऊबीजचा सण साजरा होणार आहे.

यामुळे या कालावधीत मुंबई ते नागपूर आणि नागपूर ते पुणे प्रवास करणाऱ्यांची संख्या विक्रमी वाढणार आहे. हेच कारण आहे की, या मार्गावर स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय झाला आहे. आता आपण ही स्पेशल ट्रेन कोणत्या रेल्वे स्थानकादरम्यान चालवली जाईल आणि या गाडीचे वेळापत्रक कसे राहील याबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत. तसेच या गाडीला कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा दिला जाऊ शकतो याबाबत देखील माहिती पाहणार आहोत. 

कसं राहणार वेळापत्रक

मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस ते नागपूर दरम्यान 26 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान ही गाडी चालवली जाणार आहे. या कालावधीत ही गाडी मंगळवारी आणि गुरुवारी LTT येथून २०.१५ वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी 10:25 वाजता नागपूर येथे पोहोचेल. म्हणजेच या कालावधीमध्ये या गाडीच्या 11 फेऱ्या नियोजित राहणार आहेत.

तसेच नागपूर ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान 27 ऑक्टोबर ते एक डिसेंबर दरम्यान 11 फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. या कालावधीत ही गाडी दर बुधवारी आणि शुक्रवारी १३.३० वाजता नागपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०३.३५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचणार आहे.

कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार गाडी 

रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार या मार्गावर चालवली जाणारी ही विशेष गाडी ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, वर्धा आणि नागपूर या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. मुंबई ते नागपूर आणि नागपूर ते मुंबई अशा एकूण 22 फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.