Mumbai Railway News : देशात नुकताच नवरात्र उत्सवाचा आणि विजयादशमीचा आनंददायी सण साजरा झाला आहे. यामुळे देशात सर्वत्र आनंदाचे आणि मोठे प्रसन्न वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, पुढील महिन्यात संपूर्ण देशात दिवाळीचा मोठा सण साजरा होणार आहे. यावर्षी 12 नोव्हेंबर पासून दिवाळी सणाला सुरुवात होणार आहे.
पण या सणासुदीच्या काळात रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता मध्य रेल्वेने रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने मुंबईहुन विशेष मेल एक्सप्रेस ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वे दिवाळी सणाच्या काळात विशेष मेल एक्सप्रेस गाड्या चालवणार आहे. या गाड्या मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिवी आणि मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस ते नागपूर दरम्यान चालवल्या जाणार आहेत.
यामुळे मुंबई ते नागपूर आणि मुंबई ते थिवी दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सणासुदीच्या काळात मोठा दिलासा मिळेल असा संवाद व्यक्त होत आहे. दरम्यान आता आपण या मेल एक्सप्रेस गाड्यांचे वेळापत्रक थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं असेल एल टी टी-नागपूर विशेष मेल एक्सप्रेस गाडीचे वेळापत्रक ?
मध्य रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार, ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस ते नागपूर दरम्यान 26 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या काळात आठवड्यातून दोनदा चालवली जाणार आहे. या कालावधीमध्ये ही गाडी मंगळवार व गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री सव्वा आठ वाजता निघेल आणि नागपूरला दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता पोहोचेल. तसेच ही गाडी नागपूर ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान दर बुधवारी आणि शुक्रवारी नागपूरहून दुपारी दीड वाजता निघणार आहे.
कसं असेल एलटीटी-थिवी विशेष मेल एक्सप्रेस गाडीचे वेळापत्रक?
मध्य रेल्वेने सांगितल्याप्रमाणे, एक ते 29 नोव्हेंबर दरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिवी विशेष मेल एक्सप्रेस गाडी मान्य टिळक टर्मिनस येथून दर शनिवारी सोमवारी आणि बुधवारी रात्री सव्वा दहा वाजता हॉटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता थिवी येथे पोहोचेल. तसेच दर रविवारी मंगळवारी आणि गुरुवारी ही गाडी दुपारी तीन वाजता थिवी येथून लोकमान्य टिळक टर्मिनसकडे रवाना होणार आहे.