रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! मुंबईहून सुरू होणार विशेष एक्सप्रेस ट्रेन, कसे राहणार वेळापत्रक, वाचा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Railway News : राजधानी मुंबईमधील आणि उपराजधानी नागपूर येथील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई ते नागपूर दरम्यान रेल्वे विभागाकडून विशेष एक्सप्रेस गाड्या चालवल्या जाणार आहेत.

जसं की आपणास ठाऊकच आहे की दरवर्षी 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस असतो. या दिवशी अनेक अनुयायी नागपूर येथे दीक्षाभूमीला जात असतात.

यंदा देखील हजारो अनुयायी मुंबईवरून दीक्षाभूमीला जाणार आहेत. सालाबादाप्रमाणे या ठिकाणी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या मार्गावरील रेल्वे गाड्यांमध्ये देखील या काळात मोठी गर्दी होईल असा अंदाज आहे.

दरम्यान ही संभाव्य वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेच्या माध्यमातून 14 अनारक्षित विशेष गाड्या चालवल्या जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

यामुळे महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असा आशावाद व्यक्त केला जात आहे.आता आपण या 14 विशेष अनारक्षित गाड्या कोणत्या मार्गावर चालवल्या जातील याबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत.

मध्य रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार, 6 डिसेंबरला असणाऱ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या दरम्यान तीन विशेष गाड्या चालवल्या जाणार आहे.

तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते नागपूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सेवाग्राम, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते अजनी, दादर ते सेवाग्राम, दादर ते अजनी, दादर ते नागपूर या मार्गावर प्रत्येकी एक अशा सहा विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत.

यासोबतच कलबुर्गी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कलबुर्गी यादरम्यान प्रत्येकी एक विशेष गाडी चालवली जाणार आहे. याशिवाय सोलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान दोन विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जाणार आहेत.

तसेच अजनी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या दरम्यान एक गाडी चालवली जाणार आहे. शा तऱ्हेने मध्य रेल्वे कडून महापरिनिर्वाण दिनानिमित्त 14 विशेष गाड्या चालवल्या जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान या सर्व विषयाचे रेल्वे गाड्या चार डिसेंबर ते आठ डिसेंबर 2023 दरम्यान चालवल्या जाणार असल्याचे सेंट्रल रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवास करणाऱ्या अनुयायांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा