मुंबईकरांसाठी खुशखबर ! ‘हा’ महत्त्वाचा रेल्वे मार्ग डिसेंबर महिन्यात होणार सुरू, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Railway News : मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता मुंबईमध्ये रेल्वेचा विस्तार वेगाने होत आहे. शहरात तसेच उपनगरात विविध नवीन रेल्वे मार्ग तयार केले जात आहेत.

तसेच काही जुन्या रेल्वेमार्गाचा देखील विस्तार करण्याचे नियोजन आहे. दरम्यान, आता विरार ते डहाणू रेल्वे मार्ग संदर्भात एक माहिती हाती आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, विरार-डहाणू रेल्वे मार्गाचे चौपदरीकरण करण्याचे काम 2025 मध्ये होणार आहे.

हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी खुशखबर! बोरिवली ते विरारदरम्यान प्रवास होणार गतिमान; ‘या’ एका कारणामुळे लोकल ट्रेनचा वेग वाढणार

2025 डिसेंबर पर्यंत या या मार्गाचे काम पूर्ण होईल असे माहिती अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की सध्या विरार ते डहाणू दरम्यान दोन लाईन आहेत.

मात्र पश्चिम रेल्वेच्या या महत्त्वाच्या मार्गावर प्रवाशांची वाढती संख्या पाहता या मार्गावर आणखी दोन रेल्वे लाईन विकसित करण्याची गरज निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनने या मार्गावर दोन अतिरिक्त ट्रॅक टाकण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी जवळपास 3578 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

हे पण वाचा :- मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची ‘या’ कारणाने चिंता वाढली ! पहा….

काय आहे प्रकल्पाची सद्यस्थिती

विरार-डहाणू रेल्वे मार्गावर अतिरिक्त दोन ट्रॅक टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी जवळपास 29 हेक्टर खाजगी जमीन आवश्यक राहणार आहे. तसेच दहा हेक्टर हुन अधिक सरकारी जमीन आणि पावणे चार हेक्टर जमीन वन जमीन लागणार आहे.

यापैकी सरकारी आणि वन खात्याची जमीन संपादित करण्यात आली आहे. खाजगी जमिनीसाठीची नुकसान भरपाई देखील महसूल प्राधिकरणाकडे वितरित करण्यासाठी वर्ग करण्यात आली आहे.

हे पण वाचा :- मुंबईमधील मेट्रो प्रवाशांसाठी महत्वाची बातमी; आता अंधेरी ते बीकेसी प्रवास होणार सुसाट, पहा सविस्तर

मात्र, 26.51 हेक्टर जमीनीसाठी वन मंजुरी आवश्यक आहे, जी लवकरच मिळेल असे अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे. यामध्ये 3.77 हेक्टर वन जमीन आणि शिल्लक रेल्वे जमीनीचा समावेश असल्याचे सांगितले गेले आहे. तसेच या प्रकल्पासाठी आवश्यक सर्व पुलांच्या डिझाईनला मंजुरी मिळाली आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्पाची जवळपास 16 टक्के काम पूर्ण झाले असून आता उर्वरित कामे देखील युद्धपातळीवर सुरू केली जाणार आहेत. यामुळे हा प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होणार आहे. म्हणजे डिसेंबर 2025 पर्यंत या दोन्ही रेल्वे लाईन प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत.

हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! वंदे भारत एक्सप्रेस नंतर आता देशात सुरू होणार वंदे मेट्रो; ‘या’ महिन्यात दाखल होणार Vande Metro, काय असतील विशेषता? पहा…

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा