मुंबई, सोलापूरमधील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, कसा असणार रूट? वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Railway News : राजधानी मुंबई आणि सोलापूर मधील रेल्वे प्रवाशांसाठी एक कामाची बातमी समोर आली आहे. खरे तर मुंबई ते सोलापूर आणि सोलापूर ते मुंबई हा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे.

हेच कारण आहे की भारतीय रेल्वेच्या माध्यमातून या मार्गावर देशातील लोकप्रिय हाय स्पीड वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आली आहे.

विशेष बाब म्हणजे पुण्या मार्गे धावणाऱ्या या गाडीला प्रवाशांनी अभूतपूर्व असा प्रतिसाद दाखवला आहे. यामुळे मुंबई-पुणे-सोलापूर हा प्रवास गतिमान झाला आहे.

प्रवाशांना जलद आणि आरामदायी प्रवास करता येत आहे. या गाडीमध्ये असणाऱ्या वर्ल्ड क्लास सुविधा प्रवाशांना विशेष आवडल्या आहेत.

पण गेल्या काही दिवसांपासून मुंबई ते सोलापूर असा प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. दिवाळीच्या काळापासून या मार्गावर गर्दीचं पाहायला मिळत आहे.

दिवाळीच्या काळापासून या मार्गावर धावणारे रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. विशेष म्हणजे अनेकांना तर तिकीटच मिळत नाहीये. यामुळे आता मध्य रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे.

या मार्गावर एक तात्पुरती विशेष गाडी चालवली जाणार आहे. ही गाडी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर रेल्वे स्थानकादरम्यान चालवली जाणार आहे. ही गाडी एकेरी राहणार आहे.

म्हणजे गाडी फक्त मुंबई ते सोलापूर पर्यंतचं धावणार आहे. आता आपण या गाडीचे संपूर्ण वेळापत्रक थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कस राहणार वेळापत्रक ?

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते सोलापूर ही एक सुपरफास्ट वन वे स्पेशल रेल्वेगाडी रविवारी अर्थातच 3 डिसेंबरला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सोलापूर कडे रवाना होणार आहे.ही गाडी या दिवशी रात्री साडेबारा वाजता सुटणार आहे आणि सकाळी 8 वाजून १० मिनिटांनी सोलापूर स्थानकावर पोहचणार आहे.

कुठं थांबणार ही गाडी

मध्य रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार, ही गाडी या मार्गावरील काही महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. ही विशेष ट्रेन दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड आणि कुर्डुवाडी या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार अशी माहिती समोर आली आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा