Mumbai Railway News : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईतल्या रेल्वे प्रवाशांसाठी गणरायाच्या आगमनापूर्वी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर, दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात कोकणातील चाकरमानी हजारोंच्या संख्येने आपल्या मूळ गावी परतत असतात. यंदाही कोकणात जाणाऱ्यांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे.
महत्त्वाचे म्हणजे गणरायाच्या आगमनासाठी आता फक्त तीन दिवसांचा काळ बाकी राहिला असून ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे आणि एसटीच्या अतिरिक्त फेऱ्या चालवल्या जात आहेत.
रेल्वे प्रशासन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाण्यासाठी अतिरिक्त रेल्वे गाड्या चालवत आहे आणि एसटी महामंडळाने देखील अतिरिक्त बस गाड्या सुरू केल्या आहेत.
अतिरिक्त गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने मुंबई सेंट्रल ते ठोकूर दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन सुरु केली आहे. मुंबई सेंट्रल ते ठोकूरदरम्यान या विशेष रेल्वेची एक फेरी पूर्ण झाली आहे. अजून या गाडीच्या दोन फेऱ्या होणार आहेत.
मुंबई ते ठोकूर अशा दोन आणि ठोकूर ते मुंबई अशा दोन फेऱ्या होणार आहेत. अशा परिस्थितीत आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेनच्या बाकी असलेल्या चार फेऱ्यांचे वेळापत्रक अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार वेळापत्रक ?
ट्रेन क्रमांक 09001 मुंबई सेंट्रल – ठोकूर साप्ताहिक विशेष गाडी मुंबई सेंट्रल येथून 10/09/2024 आणि 17/09/2024 रोजी 12:00 वाजता सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 08:50 वाजता ठोकूरला पोहोचणार आहे.
तसेच, गाडी क्रमांक 09002 ठोकूर – मुंबई सेंट्रल साप्ताहिक विशेष गाडी ठोकुरहून 11/09/2024 आणि 18/09/2024 रोजी रात्री 11.00 वाजता सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 07:05 वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचणार आहे.
कुठं थांबणार गाडी?
वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जंक्शन, कारवार, यासह राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी आणि मुंबईजवळील भागात ही गाडी थांबेल.
संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, मुकांबिका रोड बयंदूर (ह), इ. महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर या गाडीला थांबा मंजूर करण्यात आला आहे.