रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! मुंबईहून ‘या’ शहरादरम्यान लवकरच सुरू होणार एक्सप्रेस ट्रेन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Railway News : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. शिवाय हे एक प्रमुख पर्यटन स्थळ देखील आहे. यामुळे कामानिमित्त तसेच पर्यटनासाठी मुंबईमध्ये राज्यातील कानाकोपऱ्यातून नागरीक येत असतात. मराठवाड्यातून मुंबईमध्ये जाणाऱ्यांची संख्या देखील खूपच उल्लेखनीय आहे. दरम्यान मराठवाड्यातून तसेच खानदेशमधून मुंबईमध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे.

ती म्हणजे मराठवाड्यातील नांदेड ते मुंबई दरम्यान सुरू असलेली द्विसाप्ताहिक विशेष एक्सप्रेस गाडी आता नियमित केली जाणार आहे. ही गाडी नांदेड ते मुंबई आणि मुंबई ते नांदेड अशी आठवड्यातून दोन दिवस धावणार आहे. मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनल ते हुजूर साहीब नांदेड एक्सप्रेस ऑक्टोबर महिन्यापासून नियमित सुरू केली जाणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यामुळे नांदेड जिल्ह्यासहित संपूर्ण मराठवाड्यातून आणि खानदेश मधून मुंबईमध्ये जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. या गाडीचा नांदेड मराठवाडा आणि खानदेश मधील जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना मोठा बेनिफिट मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या गाडीचा ऑक्टोबर महिन्याच्या नवीन वेळापत्रकात समावेश केला जाणार आहे. दरम्यान आता आपण या गाडीला कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा दिला जाणार आहे आणि या गाडीचे वेळापत्रक कसे राहणार आहे याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसं असणार वेळापत्रक ? 

दर सोमवारी नांदेड-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस नांदेड येथून रात्री 21:15 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 14:20 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहचेल. तसेच दर बुधवारी ही गाडी नांदेड-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस नांदेड येथून रात्री 21:15 वाजता दुसऱ्या दिवशी 13:00 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहचेल.

तसेच ही गाडी परतीच्या प्रवासात दर मंगळवारी एलटीटी-हुजूर साहिब नांदेड एक्स्प्रेस एलटीटी येथून 16:40 वाजता निघेल आणि दुसया दिवशी 8:10 वाजता नांदेडला पोहचणार आहे. याशिवाय, ही गाडी दर गुरुवारी एलटीटी- हुजूर साहिब नांदेड एक्स्प्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 16:55 वाजता निघेल आणि दुसऱ्या 9:00 वाजता नांदेड येथे पोहचेल.

ही गाडी कोणत्या स्थानकावर थांबणार

रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ही गाडी पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, भुसावळ, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण या अतिशय महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा घेणार आहे.