Mumbai Railway News : यावर्षी 10 नोव्हेंबरपासून दिवाळीचा सण सुरू होणार आहे. म्हणजेच येत्या आठ दिवसात दिवाळीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
दिवाळीच्या खरेदीला देखील आता सुरुवात होऊ लागली आहे. अशा सणासुदीच्या काळातच मुंबईकरांसाठी मध्य रेल्वेने एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.
त्यामुळे मुंबईमधील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मध्य रेल्वेने घेतलेल्या या नवीन निर्णयानुसार, मध्य रेल्वे मार्गावर दहा नवीन एसी लोकल चालवल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे याची अंमलबजावणी दिवाळीपूर्वीच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वाढणारी गर्दी यामुळे नियंत्रणात येणार आहे. सणासुदीच्या काळात हा निर्णय मुंबईकरांसाठी लाभप्रद ठरणार आहे.
मध्य रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार या नव्याने सुरू होणाऱ्या दहा अतिरिक्त एसी लोकल सोमवार ते शनिवार दरम्यान रोजाना धावणार आहे.
याची अंमलबजावणी सहा नोव्हेंबर 2023 पासून होणार आहे. अर्थातच येत्या चार दिवसात या नवीन 10 अतिरिक्त एसी लोकल मध्य रेल्वेच्या मार्गावर धावताना दिसणार आहेत.दरम्यान, या सेंट्रल रेल्वेच्या अतिरिक्त एसी लोकल रविवारी धावणार नाहीत.
रविवारी सामान्य लोकल चालवली जाणार आहे. याशिवाय ज्या दिवशी सरकारी सुट्टी म्हणजे शासकीय सुट्टी असेल त्या दिवशी देखील एसी लोकल चालवली जाणार नाही त्या ऐवजी सामान्य लोकल चालवली जाणार आहे.
आता आपण मध्य रेल्वेकडून चालवल्या जाणाऱ्या या अतिरिक्त दहा एसी लोकलच्या वेळापत्रकाबाबत माहिती जाणून घेणार आहोत.
अतिरिक्त एसी लोकलचे वेळापत्रक खालीलप्रमाणे
1)छत्रपती शिवाजी टर्मिनन्ससाठी स्लो लोकल कल्याणहून 7.16 वाजता सुटेल आणि 08.45 पर्यंत पोहोचेल
2) कल्याण स्लो लोकल: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०८.४९ वाजता सुटेल आणि १०.१८ वाजता पोहोचेल
3) CSMT स्लो लोकल: कल्याणहून 10.25 वाजता सुटेल, 11.54 वाजता CSMT ला पोहोचेल.
4) अंबरनाथ स्लो लोकल: CSMT वरून 11.58 वाजता सुटेल आणि अंबरनाथला 13.44 वाजता पोहोचेल
5) सीएसएमटी स्लो लोकल: अंबरनाथहून 14.00 वाजता सुटून 15.47 वाजता सीएसएमटीला पोहोचेल
6) डोंबिवली स्लो लोकल: CSMT वरून 16.01 वाजता सुटून डोंबिवली येथे 17.20 वाजता पोहोचते.
7) परळ स्लो लोकल: डोंबिवलीहून 17.32 वाजता सुटेल आणि परळ येथे 18.38 वाजता पोहोचेल.
8) कल्याण स्लो लोकल: परळहून 18.40 वाजता सुटून, कल्याणला 19.54 वाजता पोहोचते
9) परळ स्लो लोकल: कल्याणहून 20.10 वाजता निघते, परळ येथे 21.25 वाजता पोहोचते.
10) कल्याण स्लो लोकल: परळहून 21.39 वाजता सुटून, कल्याणला 22.53 वाजता पोहोचते.