Mumbai Railway News : सध्या महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात दीपोत्सवाचा सण साजरा होत आहे. दरम्यान याच दिवाळीच्या काळात देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राचे राज्य राजधानी मुंबई शहरातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आली आहे.
रेल्वे विभागाने मुंबईमधील नागरिकांसाठी विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याची मोठी घोषणा केली आहे. यामुळे मुंबईमधील रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार असून यामुळे प्रवाशांचा प्रवास सणासुदीच्या काळात गतिमान होईल अशी आशा आहे.
खरंतर दिवाळीच्या काळात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असते. या अतिरिक्त गर्दीमुळे मात्र प्रवाशांना मोठा फटका बसतो. दरम्यान ही अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे विभागाच्या माध्यमातून विशेष गाडी चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही गाडी मुंबई ते छपरादरम्यान चालवली जाणार आहे.
मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस ते छपरा रेल्वे स्थानकादरम्यान ही गाडी चालवली जाणार असून आज आपण याविषयी एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार या संदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार वेळापत्रक?
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०५११४ एलटीटी मुंबई-छपरा उत्सव विशेष गाडी एलटीटी येथून ४, ११ आणि १८ नोव्हेंबर २०२४ रोजी सोडली जाणार आहे. या दिवशी ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री ८.१५ वाजता निघेल आणि तिसऱ्या दिवशी दुपारी १२.५० वाजता छपरा येथे पोहोचणार आहे.
तसेच परतीच्या प्रवासात ट्रेन क्रमांक ०५११३ छपरा-एलटीटी उत्सव विशेष छपरा येथून ३, १० आणि १७ नोव्हेंबरला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दिवशी ही गाडी छपरा रेल्वे स्थानकावरून पहाटे साडेपाच वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सव्वासहा वाजता एलटीटी मुंबईला पोहोचणार आहे. यामुळे मध्य रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नक्कीच दिलासा मिळणार आहे.