मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! ‘या’ शहरासाठी सुरू होणार विशेष एक्सप्रेस ट्रेन, कसा असेल रूट, वेळापत्रक, थांबे?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Railway News : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात पुढील महिन्यात दिवाळीची मोठी धूम राहणार आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण तयार होत आहे. वस्त्र, अलंकार खरेदी वाढण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या सणात रेल्वे प्रवाशांची देखील संख्या मोठ्या प्रमाणात वाढते.

दरम्यान कोकण रेल्वेने पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सतत वाढत असलेली गर्दी लक्षात घेऊन एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. यावर्षी 12 नोव्हेंबरला दिवाळी सण सुरू होणार आहे. म्हणून या सणाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने अतिरिक्त गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या सणासुदीच्या काळात कोकण रेल्वे मार्गावर नेहमीच मोठी गर्दी राहते. मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची ही गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वे आणि दक्षिण रेल्वेच्या समन्वयाने दिवाळी सणाच्या कालावधीत अतिरिक्त गाड्या सोडण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

20 ऑक्टोबर 2023 ते 1 डिसेंबर 2023 पर्यंत या विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. यात लोकमान्य टिळक टर्मिनस-मंगळूर दरम्यान साप्ताहिक विशेष रेल्वे गाडी चालवण्याचा निर्णय झाला आहे. आता आपण या विशेष रेल्वे गाडीचे संपूर्ण वेळापत्रक थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसं असेल वेळापत्रक ?

लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंगळूर स्पेशल ट्रेन 20 ऑक्टोबर ते 1 डिसेंबर दरम्यान चालवली जाणार आहे. ही एक साप्ताहिक गाडी राहणार आहे. म्हणजे ही गाडी फक्त आठवड्यातून एकदाच चालवली जाईल. ही गाडी या कालावधीमध्ये दर शुक्रवारी रात्री सव्वा दहा वाजता एलटीटी वरून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी मंगळूर रेल्वे स्टेशनवर पोहोचेल.

तसेच जर आपण मंगळुरू ते लोकमान्य टिळक टर्मिनस स्पेशल ट्रेन चा विचार केला तर ही गाडी 21 ऑक्टोबर ते दोन डिसेंबर दरम्यान चालवली जाणार आहे. ही देखील एक साप्ताहिक गाडी असेल. ही गाडी प्रत्येक शनिवारी मंगळुरू रेल्वे स्थानकावरून सायंकाळी पावणे सात वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजून पंचवीस मिनिटांनी ही गाडी एलटीटी रेल्वे स्थानकावर पोहोचेल.

कुठं मिळणार थांबा ?

कोकण रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार एलटीटी-मंगळूर स्पेशल ट्रेन ठाणे पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मुक्काम, मुल्की आणि सुरथकल या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.