Mumbai Railway News : भारताची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी हाती आली आहे. ती म्हणजे रेल्वे प्रवाशांसाठी मायानगरी मुंबई येथून एक विशेष एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आला आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वे मार्गावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
मुंबई ते उत्तर प्रदेशदरम्यानच्या मार्गावर देखील प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. हेच कारण आहे की मध्य रेल्वेने मुंबई ते उत्तर प्रदेश दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वे मुंबई ते गोरखपुर दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवणार आहे. यामुळे मुंबई ते उत्तर प्रदेश आणि उत्तर प्रदेश ते मुंबई हा प्रवास जलद होईल अशी आशा आहे.
यामुळे मुंबई येथे वास्तव्याला असणाऱ्या उत्तर प्रदेश मधील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल असे बोलले जात आहे. दरम्यान आता आपण मुंबई ते गोरखपुर दरम्यानच्या या विशेष एक्सप्रेस ट्रेन विषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कस राहणार वेळापत्रक
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोरखपूर ही विशेष एक्सप्रेस 30 जून पर्यंत धावणार आहे. ही गाडी प्रत्येक बुधवार, शुक्रवार आणि रविवारी एलटीटी येथून सकाळी 10:25 वाजता सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी सहा वाजता गोरखपुर ला पोहोचणार आहे.
तसेच गोरखपूर येथून ही गाडी 28 जून पर्यंत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारला रात्री सव्वानऊ वाजता सुटणार आहे आणि तिसऱ्या दिवशी सायंकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनी मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचणार आहे.
कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार
या विशेष एक्सप्रेस ट्रेन ला या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ही गाडी आपल्या राज्यातील ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.
तसेच यापुढे ही गाडी खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, उरई, कानपूर सेंट्रल, लखनऊ, बाराबंकी, गोंडा, मनकापुर, बस्ती आणि खलीलाबाद येथेही थांबणार आहे.